वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
कोरा धनादेश, कोरा बाँड पेपर, खरेदीखत, नोंदी असलेल्या डायरी जप्त
✍️गणेश खडसे
यवतमाळ शहर प्रतिनिधी
यवतमाळ, दि १० मार्च (जिमाका) :- जिल्हा निबंधक (सावकारी) यवतमाळ यांचे आदेशान्वये सावकारी पथकाने ९ मार्च २०२३ रोजी गिरीश चंद्रकांत सुराणा प्रो. प्रा. शुभ लाभ ज्वेलर्स, सोनार लाईन, यवतमाळ यांचे ज्वेलर्स दुकान व राहते घरी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६अन्वये अधिकाराचा वापर करून झडती कारवाई केली. यामध्ये आक्षेपार्ह ७५ कागदपत्रे, दस्ताऐवज , मौल्यवान वस्तु , धनादेश जप्त करण्यात आले आहेत.
राहुलकुमार श्रीधर राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक,रा. काँग्रेस नगर, ता. जि. अमरावती यांनी ८ मार्च २०२३ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ या कार्यालयास तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी नमुद केले होते की, गिरीश सुराणा, यवतमाळ हे अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असून त्यांचेकडुन सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यावेळी त्यांनी मित्र या नात्याने काही रक्कम रु. ६ लाख ५० हजार चे दागिने उधारीवर अर्जदार यांना दिले होते व त्यापोटी अर्जदार यांनी त्यांच्या मोजा जिरेगाव ता. दौंड जि. पुणे येथील गट क्र.४५ मधील ११ गुंठे शेत जमिनीची सौदाचिठ्ठी गैरअर्जदार यांच्या नावे करून दिली होती. सदर दागिन्याची संपुर्ण रक्कम परत देऊन सुध्दा गैरअर्जदार यांनी अधिकच्या रक्कमेची मागणी केल्याने अर्जदार यांनी तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरिता सावकारी पथकाने ९ मार्च २०२३ रोजी गैरअर्जदार गिरीश चंद्रकांत सुराणा यांचे राहते घरी व त्यांचे शुभलाभ ज्वेलर्स दुकानाची झडती घेतली. सदर कारवाई दरम्यान गैरअर्जदार यांचे घरातुन संशयास्पद कोरा चेक, कोरा बाँड पेपर, खरेदीखत, नोंदी असलेल्या डायरी व पिवळया धातुच्या काही वस्तु असे एकुण ७५ कागदपत्रे व वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कागदपत्रांची पडताळणी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.सदर कारवाई सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हाउपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे नियोजनात सावकारी पथकातील सुनिल भालेराव,पथक प्रमुख तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पुसद केशव मस्के.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, दिग्रस, राजेश गुर्जर, अधिक्षक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,यवतमाळ, व्ही. व्ही. रणमले, सहाय्यक निबंधक, बाभुळगाव तथा पथक प्रमुख अनिल सुरपाम,सहकार अधिकारी, पुसद, के. टी. खटारे, सहाय्यक निबंधक, राळेगाव, अमोल इंगोले, सावकारी कक्ष प्रमुख, एस.डब्लु. खरतडे, श्रीमती सविता भोयर, ज्योती गायकवाड, संध्यापालकर, स्वाती राऊत तसेच पोलीस प्रशासनातील सतिश शर्मा.सहाय्यक फौजदार, ज्योती बान्ड्रसवार, पोलीस नाईक भागवत पाटील, पोलीस शिपाई, पुजा जुमनाके, पोलीस शिपाई तसेच पंच म्हणून आनंद भगत महसुल विभाग व राजेंद्र सातपुडके सचिव ग्रा. वि. का.मुरझडी हे सदर कार्यवाही मध्ये सहभागी होते.सदर संपुर्ण कारवाई जिल्हाधिकारी, यवतमाळ तथाअध्यक्ष, जिल्हा संनियंत्रण समिती आणि मा. पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहकार विभाग, महसुल विभाग आणि पोलीस प्रशानातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...