वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी.
✍️गणेश खडसे
यवतमाळ शहर प्रतिनिधी
यवतमाळ:-जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळ मध्ये राज्य परिवहन मंडळातर्फे महिला चालक आणि वाहकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एसटी विभागीय कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात एसटीचे स्टेअरिंग सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांचा सन्मान तसेच राज्यातील पहिल्या महिला वाहक व अन्य महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी तर स्त्रीरोग तज्ञ डॉ. रजनी कांबळे, डॉ सारिका शहा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत, महिला पत्रकार राधिका आव्हाड सानप, आगार व्यवस्थापक विवेक बन्सोड, कामगार अधिकारी सुनील मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती. एसटी बस चे स्टिअरिंग सांभाळणाऱ्या व वाहक म्हणून सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य जपावे, वेळोवेळी तपासणी कराव्या जेणेकरून महिला चालक वाहकांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास प्रवाश्यांचा प्रवास देखील सुरक्षित होईल. आदिवासी दुर्गम भागातील महिलांना एसटी च्या सेवेत सर्वतोपरी सहकार्य केल्या जाईल असे यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले तर एसटी च्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा डॉ रजनी कांबळे यांनी केली. डॉ सारिका शहा, श्रीकांत राऊत, राधिका आव्हाड यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिल्या महिला वाहक संगीता जयसिंगकार, ३३ वर्षे सेवा देणाऱ्या आस्थापना पर्यवेक्षक माया कंगाले, शिपाई मीरा कळसाईत व श्रीमती वनकर, पुणे येथील पत्रकार श्री सानप तसेच सर्व महिला चालक आणि वाचकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक प्रतिभा अहेर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रमोदिनी किनाके, प्रतिभा भोयर, वैशाली चाके, सुनील मडावी, दिनकर इंगोले व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...