आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिल्हाधिकारी अमोल येडगे
✍️गणेश खडसे
यवतमाळ शहर प्रतिनिधी
यवतमाळ:- दिनांक 8 मार्च सामाजिक सुधारणा असोत की उद्योग क्षेत्रातील भरारी, महिलांची कर्तबगारी आज सर्वच क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. शासन, प्रशासनात महिला चांगलं काम करीत आहेत. त्यामुळे ३६५ दिवस घरीदारी समाजात सर्वत्र महिलाराज यावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जागतिक महिला दिन निमित्ताने बचत भवन येथे माविम आणि जिल्हा प्रशसनाच्या वतीने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, खनिकर्म अधिकारी शिरिष नाईक, जिल्हा बॅंक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले,मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, माविमचे जिल्हा समन्वयक रंजन वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांना उपजवीकेचे साधन उपलब्ध करून देणे हा मुख्यत: माविमचा उद्देश आहे. जिल्ह्यात ८० हजार महिलांचे बचत गट मावींकडे नोंदवलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातुन अगदी व्यावसाईक पद्धतीने महिलांनी उद्योग सुरु केले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील महिलांच्या हाती पैसा आला आहे. यासोबतच त्यांना समाजात त्यांचे विचार, मत मांडण्याची संधीही मिळत आहे. सामाजिक सुधारणा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनीच पुढे यावे.
समाजकारण असो की राजकारण की उद्योग क्षेत्र महिलांनी सर्वत्र त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष संगिता राठोड यांनी महिलांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महिला दिन हा केवळ एक दिवस साजरा न करता 365 दिवस आनंदाने साजरा करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला, गावाला आनंदी आणि सुखी करू शकता असेही त्या म्हणाल्या.
आपण स्वतः एक महिला असताना आपल्या मुलगा आणि मुलीला समान वागणूक द्यावी. तसेच घरात येणाऱ्या सुनेला मुलीप्रमाणे स्वीकारण्याचे धैर्य महिलांनी दाखवावे. कस्तुरीचा आपण स्वतः शोध घेऊन इतरांच्या जीवनातही कस्तुरीचा सुगंध दरवळू असे प्रतिपादन सुनिता चौधर यांनी केले. यावेळी क्रांती काटोले, विद्या शितोळे, मनिषा सावळे, मानव विकास जिल्हा नियोजन अधिकारी, शांताबाई ईंगळे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांना उद्योग उभारण्यासाठी आय सी आय सी आय बॅंकेमार्फत मंजुर कर्जाचे वितरण करण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...