*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
Reg No. MH-36-0010493
याची प्रदर्शनातून मांडणी
✍️दत्तात्रेय बोबडे
संपादक
यवतमाळ – ‘सिखें’ (सेंटर फॉर इक्वीटी अँड क्वालीटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन) या मुंबईस्थित एनजीओतर्फे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्या संयुक्त समन्वयातून बाभूळगाव पंचायत समितींतर्गत ‘टीआयपी’ (टिचर इनोव्हेटर प्रोग्राम) सुरू आहे. या उपक्रमांतर्गत भाषा आणि गणित विषय शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविल्या जात असून त्यासंदर्भात बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांमध्ये 'सिखें इंडिया उत्सव' आयोजित करण्यात आला आहे.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत बाभूळगाव पंचायत समितीमधील ६१ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी 'टीआयपी' कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांत शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून ‘सिखें’ ने राबविलेल्या विविध शैक्षणिक पद्धतींमधून विद्यार्थ्यांमध्ये काय बदल घडले, याची पडताळणी केंद्रस्तरावर आयोजित ‘सिखें इंडिया उत्सव’ या प्रदर्शनातून केली जात आहे. बाभूळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटंबा येथे नुकताच हा उत्सव आयोजित करण्यात आला होता.
बाभूळगाव येथील प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी वामन कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख शशिकांत खडसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. सोनल तातेड शिक्षिका वैशाली बोरकुटे, अश्विनी बोरकर तसेच गिमोना येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदिप वाढाई, सहायक शिक्षिका मनिषा वरूटकर यांच्यासह बाभूळगाव केंद्रातील शिक्षक व पालक आदी उपस्थित होते. तर जिल्हा परिषद शाळा कोटंबा येथील प्रदर्शनात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल टिकले, प्रभारी केंद्रप्रमुख प्रभाकर शेरजे सहशिक्षिका प्रणिती जोशी, सारिका गुल्हाने, चोंडी शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री महालकर, सहशिक्षिका शितल चौधरी व सुकळी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणितीय मॉडेल्स बघून पाहुण्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट व वैविध्यपूर्ण पद्धतीने भाषा आणि गणित विषयातील त्यांची समज, मांडणी, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर आधारित अनेक प्रश्न पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. त्याची समर्पक उत्तरे देवून विद्यार्थ्यांनी या उपक्रमामुळे वाढलेल्या अध्ययनस्तराची प्रचिती पाहुण्यांना दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थी व्यक्त होत असून त्यांच्यात धीटपणे मांडणी करण्याची क्षमता विकसित होत असल्याची प्रतिक्रिया गटशिक्षणाधिकारी वामन कुमरे यांनी यावेळी बोलताना दिली. याचप्रमाणे टिआयपी कार्यक्रमात सहभागी इतर शाळांमध्येही पुढील दिवसांमध्ये प्रदर्शने नियोजित आहेत. शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, सिखेंचे जिल्हा समन्वयक संभाजी भिसे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी सिखेंचे टीचर कोच नम्रता कडव, शिवराज कावडकर आणि शाळामित्र राम दांडगे, विक्रम रामटेके आदींनी परिश्रम घेतले.
चौकट
‘सिखें’- टीचर इनोव्हेटर प्रोग्राम
इयत्ता पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील ‘सिखें’ ही संस्था शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने ‘टीचर इनोव्हेटर प्रोगाम’ राबवित आहे. यवतमाळ जिल्ह्यात सिखेंने चालू शैक्षणिक वर्षांत बाभूळगाव तालुक्यात हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात भाषा आणि गणित विषय शिकविण्याच्या विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचे प्रशिक्षण शिक्षकांना दोन टप्यांत देण्यात आले. शिक्षकांनी त्यानंतर या पद्धतीप्रमाणे त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविले. सरावासाठी सिंखेद्वारे विद्यार्थ्यांना कार्यपुस्तिका देण्यात आल्या. एकाच पाठाची किंवा गणिताची विविध प्रकारे मांडणी करण्याची पद्धत विद्यार्थ्यांनी आत्मसात केली आणि कार्यपुस्तिकेमुळे त्यांचा सराव होण्यास मदत होवून त्यांच्या अध्ययनस्तरात वाढ झाल्याचे निरीक्षण या कालावधीत शिक्षकांसह सिखें संस्थेने नोंदविले आहे.
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या...
*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी...
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...
भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...
भारतीय वार्ता :-शेतीमालावरील वायदेबंदी कायम स्वरूपी उठवावी, यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडणे गरजेचे...