आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
थोरल्या बाजीरावांच्या काळापासुन माळवा प्रांताची जबाबदारी होळकर घराण्याकडे होती , मल्हारराव होळकर पेशव्यांचे विश्वासु ... त्यांचे चिरंजीव खंडेरावांची पत्नी म्हणुन अहिल्याबाई होळकर कुटुंबात आल्या ...मराठवाड्यातील बीड जिल्हयातील मौजे चोंढे गावातील माणकोजी शिंद्यांकडे गावची पाटीलकी होती त्यांची ही कन्या , लिहा वाचायला येणारी ही आठ वर्षाची मुलगी माळवा प्रांतात आली आणि स्वतःचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहुन गेली.
कर्तबगार सासरे आणि धार्मिक पण करारी सासु गौतमाबाई यांच्या सहवासात अहिल्याबाईंचे व्यक्तीमत्व घडत गेले ,
तल्लख बुद्धी असलेल्या सुनेवर सासऱ्यांचा प्रचंड विश्वास होता, महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेराव आणि अहिल्याबाईंना दोन अपत्ये झाली, मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या.
त्या काळच्या स्त्रियांना नियती वैधव्य माथी लिहुनच जन्माला घालत असावी असे वाटुन जाते ..वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी म्हणजे १७५४ साली पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत कामी आले आणि अहिल्याबाईना वैधव्य देऊन गेले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.” सासऱ्यांच्या इच्छेचा मान ठेवुन सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित करायचा निर्णय त्यांनी घेतला.
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्या करता मल्हारराव सतत मोहिमा आखत होते, मल्हाररावांच्या अनुपस्थितीत संपुर्ण राज्यकारभार अहिल्याबाई पाहत होत्या , अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ मल्हारवांना मृत्यूने गाठले....मल्हाररावानी पेशव्यांच्या चार कारकिर्दी बघितल्या होत्या, एकुणच पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता.
अशा या मल्हाररावांचा मृत्यु पेशवे आणि आहिल्याबाई दोघांकरता एक धक्का होता ...ओघानेच अहिल्याबाईंवर मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचे पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली, पण दुर्दैवाने २७ मार्च १७६७ ला त्यांचाही मृत्यु झाला... एका वर्षाच्या आत दोन मोठे धक्के...
धक्यांना न डगमगणारी माणसंच इतिहास घडवत असतात ...
इथुन अहिल्याबाई खऱ्या अर्थाने राज्यकर्र्त्या झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालवला...असे अनेक घाव पचवले ..
आपल्या कारकिर्दीत कीती गोष्टी केल्या असाव्यात ?राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली ...तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात असलेले प्रशस्त देवघर आजही बघण्या सारखं आहे ... नदीला घाट बांधले....अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.
त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी वेळ आली की कठोर निर्णय घेत , अहिल्याबाई अतिशय धर्मपरायण होत्या ..होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
राज्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई !
अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया , धर्मशाळा बांधल्या . राज्यात हकीम वैद्य नेमले . स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडत होत्या ...
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या.
उभ्या आयुष्यात अहिल्याबाईंनी कीती मंदिरे बांधली आणि कीती देवळांचा जीर्णोद्धार केला याची गणतीच नाही ...
पेशव्यांवर त्यांची अपार निष्ठा होती , माधवराव , सवाई माधवराव ,नाना फडणवीस त्यांचा योग्य मान करत .
त्यांची मुलगी मुक्ताबाई , हिचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी झाला होता , हे यशवंतराव ३ डिसेंबर १७९१ ला वारले , तेंव्हा मुक्ताबाई सती गेल्या , त्या पुर्वी १७९० ला मुक्ताबाईचा मुलगा आणि अहिल्याबाईंचा नातु नथाबा मृत्यु पावला होता ...
आयुष्यात दुःखा बरोबर अनेक संघर्षानाही तोंड द्यावे लागले.... पेशवाईच्या गादीवर सवाई माधवराव होते, पेशव्यांकडे अहिल्याबाईंना मनाचे स्थान होते ,
त्यांचा जुना दिवाण गंगाधर चंद्रचुड हा राघोबादादांना जाऊन मिळाला आणि राघोबादादा ला इंदुर बळकावण्याचा सल्ला दिला , आहिल्याबाईनी परिस्थितीला सामोरे जाऊन राघोबादादाची योग्य कान उघडणी केली ... इथुन पुढे राघोबादादा अहिल्याबाईंना वचकुन राहिले ..
शिंदे - होळकर हा वाद फार जुना , त्यालाही त्यानी धैर्याने तोंड दिले , स्वतः त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर आलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीच्या , सावळ्या वर्णाच्या , डोईवर पदर घेतलेल्या अशा या स्त्री कडे पाहुन भले भले नतमस्तक होत होते ... कारण होते त्यांचे आभाळा एवहढे थोर कर्तृत्व !!
राहाणी अतिशय साधी , कायम पांढरी पातळे , दरबारात आसनावर पांढरी घोंगडी अंथरलेली असे .....
दिनचर्या ठरलेली , सुर्योदयापुर्वी उठणे , त्या नंतर स्नान आणि पुजा अर्चा , नंतर दान धर्म , दरबारात जाऊन काम काज पाहणे , संध्यकाळी देवळात जाणे ... या दिनचर्येत बहुतेकदा खंड नसे .
अहिल्याबाई ना पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य मिळाले ... पण आयुष्यात एकावर दुःख पचवत होत्या .. त्यात राज्यकर्त्यांची परिस्थिती मोठी विचित्र असते , प्रजेचा विचार करून पोटातले दुःख डोळ्यात किँवा ओठावर आणायची परवानगी नसते...
शिव उपासक असलेल्या अशा या थोर स्त्रीचे १३ ऑगस्ट १७९५ ला महेश्वरला वृद्धापकाळाने निधन झाले....
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या. ज्या कालात महिलांना गोषातच रहावे लागे, शिक्षणावर बंदी होती त्या काळात मल्हाररावासारख्या ख-या पुरोगाम्याने अहिल्येला शिकवले. नुसते लिहिणे-वाचणे नव्हे तर अहिल्यादेवी भालाफेकीत इतक्या तरबेज झाल्या कि खुद्द टिपू सुलतानानेही त्याबाबत गौरवोद्गार काढले. "तत्वज्ञ महाराणी" हा किताब त्याने अहिल्यादेवींना दिला.
अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र काढले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच पण विधवांना कोणतेही मुल दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत असतांनाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन स्वत: आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर जो तरुण माळव्यातील दरवडेखोरांचा उपद्रव नष्ट करीन अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते हे आम्ही कधीच लक्षात घेतले नाही.महिला सबलीकरण म्हणजे काय हे त्यांनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले. आजच्या सरकारांनाही त्यापासून शिकायला हवे.
युरोपात एकोणिसाव्य शतकापर्यंत स्त्रीया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना जोन माल्कममुळे अहिल्यादेवी माहित झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते तर त्यांनी अहिल्यादेवींत आपले आदर्श पाहिले. इतके कि जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रीयांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणारी महिला अहिल्यादेवी असुनही आमच्यासमोर त्यांची प्रतिमा केवळ हातात पिंड घेतलेली साध्वी अशी निर्माण केली गेली. थोडक्यात खरा आदर्श पुसला गेला. भारतीय स्त्रीयांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असती तर परंपरावाद्यांचे तेंव्हाच नाक ठेचले गेले असते व आज महिला अधिक आत्मसामर्थ्याने जगल्या असत्या.
कोणाच्या हातून काही काढून घेतले तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्याकालात यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत यात्रेकरुंकडुन भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कसायला जमीनीही दिल्या.
आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपारिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपारिक व्यवसायांत पुरवले नाही. सर्वांना नोकरीची गाजरे तेवढी दाखवली. वंचितांचे अधिक वंचितीकरण होत त्यांची ससेहोलपट मात्र होत आहे. येथे अहिल्यादेवींचे आदर्श घेत पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत. पण या अहिल्याबाई सांगणे त्यांच्या अडचणीचे आहे.
संदर्भ -
मराठी रियासत खंड ७ आणि इतर
भारतीय संस्कृती कोष खंड १०
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...