आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी (प्रवीण उद्धवराव गायकवाड् : राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील गुरूदेव मानव सेवा भजन मंडळाच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातील नामवंत पुरुष व महिला भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचे उद्घाटन कृष्णराव राहुळकर यांच्या हस्ते अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले.या दिनांक 25/2/2023 पासून 27/2/2023 पर्यंत चालत असलेल्या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन या उपक्रमाची स्तूती केली.या स्पर्धेतून पुरुष गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमरावती जिल्ह्यातील निमगव्हाण येथील आदर्श गुरुदेव भजन मंडळ यांनी पटकाविले.तर द्वितीय क्रमांक राष्ट्रसंत गुरूदेव सेवा मंडळ जनूना, जिल्हा वर्धा, तृतीय क्रमांक अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ वरोरा जिल्हा चंद्रपूर, चतुर्थ क्रमांक संत गजानन गुरूदेव मंडळ मारेगाव जिल्हा यवतमाळ,पाचवा क्रमांक मानवसेवा गुरूदेव मंडळ पिंपरी जिल्हा यवतमाळ,सहावा क्रमांक बालाजी गुरूदेव सेवा मंडळ घाटसावली,सातवा क्रमांक नवयुवक गुरूदेव सेवा मंडळ मिटनापूर,आठवा क्रमांक गोपालकृष्ण गुरूदेव सेवा मंडळ पांढरकवडा,नववा क्रमांक ग्रामनाथ गुरूदेव सेवा मंडळ बोरगाव मेघे यांनी पटकावला त्याचप्रमाणे महिला गटातून प्रथम बक्षीस संतकृपा भजन मंडळ चंद्रपूर,दुसरे बक्षीस आप्पास्वामी भजन मंडळ शेगाव, जिल्हा बुलढाणा,तिसरे बक्षीस क्रांतीज्योती महिला मंडळ चनाखा,चवथे बक्षीस जिजाऊ भजन मंडळ नेहरूनगर चंद्रपूर,पाचवे बक्षीस गुरूदेव महिला मंडळ भद्रावती,सहावे बक्षीस क्रांतीज्योती महिला मंडळ जैतापूर,सातवे बक्षीस दत्तकृपा महिला मंडळ कुंभा,आठवे बक्षीस नवदुर्गा मंडळ देवळी,नववे बक्षीस सुन्नाढोकी यांनी पटकाविले. ह्या भजन स्पर्धा पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उत्तम भोरे, सदानंद भोरे,गजानन पारधी,श्रावनसिंग वडते,किरण निमट,पुनेश्वर ऊईके,शेषराव भोरे धनराज आत्राम, सदानंद मेश्राम, गजानन ठाकरे, शेषराव ऊईके,रामधन राठोड, भानुदास चव्हाण,सुदाम राठोड, विष्णू ऊईके,मोतीसिंग वडते, नागोराव राठोड, तुळशीराम वडते,मधूकर जाधव, बळीराम जाधव,कवडू राठोड,विजय खैरे,मनोज राठोड,राहूल भोरे, प्रविण वडते,राहूल वडते,पवन नेहारे,राजू धोटे, जनार्दन कडू,जिवन मेश्राम, शंकर मेश्राम,किरण कोल्हे, मारोती कोल्हे, हनुमान शिवरकर, प्रविण आडे,आकाश जाधव यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावनसिंग वडते यांनी केले.तर प्रास्ताविक शेषराव भोरे यांनी केले तर आभार किरण निमट यांनी मानले.या स्पर्धेसाठी खूप दुरून दुरून आणि प्रसिद्ध भजनी मंडळ आल्याने गावकsऱ्यांमध्ये आनंद दिसून येत होता.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रमोद देशमुख महाराज, सचिन जाधव,मधूकर चौधरी यांनी काम पाहिले. बक्षिसाचा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने घेण्यात आला.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...