भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे
यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी, पुरवठा लीपीक, निता राजेश जैन अमरावती, रेशनकार्ड दुकानदार सि. के . मेहता, ज्ञानेश्वर गुल्हाने या बोगस राशन तयार करून देवाऱ्या रॅकेट ची तक्रार केलेली आहे
विशेष म्हणजे सामान्य मानसांना नविन रेशनकार्ड बनवायला तहसिल . कार्यालयाचे उंबरठे झीजवावे लागतात परंतु यवतमाळ येथील 2017 ला मृत पावलेल्या कांताबाई आणि केशरीलाल आबड यांच्या रेषन . कार्डा मध्ये अमरावती येथील निता राजेश जैन वय वर्ष 50 यांचे नाव निता केशरीलाल आवड वय वर्ष 20 असे नाव टाकुन बेबनाव तयार केलाल असुन या मधील अतिशय गंभीर बाब म्हणाजे मृत केसरिलाल यांची संपत्ती हडपण्या करीता ज्ञायालयात खरे वारसदार दाखविण्या करीता पुरवठा विभागाने संगनमत करून बोगस रेशनकार्ड तयार करून ज्ञायालयाची दिशाभुल केलेली असून
मृत आबड यांना कोणतेही अपत्य
मुलबाळ नसल्याने त्यांची यवतमाळ येथील पोस्ट ऑफीस चौक येथील घर, नगदी पैसे, सोने नाने, शेत जमिन 78/2/1 मौजा लोहारा येथील 2.02
हेक्टर इतक्या जमिनी व इतर मालमत्ते वर त्यांच्या पश्चात वारसदार म्हणुन यां बोगस रेशनकार्डच्या आधारे खरे वारसदार दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न गैरअर्जदार आणि पुरवठा विभागाने संगनमत करून भोगळ कारभार केल्याचा आरोप अर्जदार आणि मृत आबड यांचे वारसदार विजय आबड यांनी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना तक्रार दिली आहे सबंधीतांवर फसवणुकी चे गुन्हे दाखल करून बोगस राषणकार्ड रद्द करने अपेक्षीत होते विशेष म्हणजे विजय आबड यांच्या पुराव्या निशी तक्रारी नंतर तहसिलदार यांनी गैरअर्जदार यांना नोटीस दिली त्यामध्ये स्पष्ट आहे की गैरअर्जदार यांनी चुकिचे व खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभुल करून फसवणुक केलेली आहे व चुकिच्या मार्गाचा वापर करून सदर रेशनकार्ड हस्तगत केले असे या वरून सिद्द होते
म्हणजेच तहसिलदार यांनी त्यांना प्रकरणाची वस्तु स्थीती माहित असतांना व बोगस राशन कार्ड बनविले हे सिद्ध झाले असताना सुद्धा संबंधी त व्यकती वर गुन्हे दाखल करणे अपेक्षीत होते परंतु तहसिलदार यांनी खरे निशकर्ष मुद्दे यांच्या कडे मुद्दाम दुर्लक्ष करून गैरअर्जदार 1 ते 5 यांना गंभीर गुन्ह्यातून वाच विन्या साठी खऱ्या वस्तुस्थिती कडे जानिव पूर्वक दुर्लक्ष करून खोटे व बेकायदेशिर निशकर्ष काढुन व स्वतः ला वाचविण्यासाठी स्वतः पोलीस्टेशन ला रिपोर्ट दिला नाही असे बोगस रेशनकार्ड बनुन देण्याचे मोठे रॅकेट आहे करीता शासनाने तात्काळ तहसिलदार, निरिक्षण अधिकारी , शिधापत्रिका लीपिक यांना निलंबीत करावे
अशा अशयाची तक्रार दिली असुन कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करण्याचे म्हणाटले आहे