Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शालेय कबड्डी तालुका...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शालेय कबड्डी तालुका स्पर्धा ग्रामीण विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदाताई खुरपुडे

शालेय कबड्डी तालुका स्पर्धा ग्रामीण विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारी  जिल्हा क्रीडा अधिकारी नंदाताई खुरपुडे

 (राळेगाव तालुका प्रतिनिधी) प्रवीण गायकवाड राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोबतच हिरक महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 19/1/2023 रोज गुरूवारला तालुक्यातील सर्व विद्यालयातील सर्व शालेय खेळाडू सतरा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घघाटन राळेगाव येथील समाजसेवक विनय मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले.

या तालुका स्पर्धेचे प्रास्ताविक कबड्डी खेळाचे शाळेतील प्रशिक्षक श्रावनसिंग वडते यांनी केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे विनय मुनोत यांनी शिक्षण आणि खेळाचा संबंध काय याबद्दल माहिती दिली.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे, सचिव रोशन कोल्हे, संचालक चित्तरंजन कोल्हे,भरत पाल,शेखरराव झाडे, दिलीप देशपांडे,सुरेश गंधेवार, गुलाबराव महाजन ,विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड, राळेगाव नगरी या साप्ताहिकाचे संपादक महेश भोयर,झाडगावचे पोलिस पाटील प्रशांत वाणी उपस्थित होते.या  कार्यक्रमानंतर सर्व सामने खेळून झाल्यावर अंतिम सामन्याच्या वेळी यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी नंदाताई खुरपुडे मॅडम यांचे मैदानावर आगमन झाले.त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षिका तथा क्रीडा समिती सदस्य वंदना वाढोणकर यांनी नंदाताई खुरपुडे मॅडम यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूचा परिचय करून दिला सोबतच प्रशिक्षक शिक्षकांचा परिचय करून दिला.त्याच प्रमाणे या सर्व खेळासाठी राळेगाववरुन बोलावलेले पंच रफीक शेख,राजू भटे,गजू नाकाडे,सुयोग ठाकरे,विशाल हजारे यांचा सुद्धा परिचय करून दिला.या खेळात प्रथम पारितोषिक म्हणून चषक इंदिरा गांधी ज्यूनियर काॅलेज राळेगाव यांनी तर उपविजेतेपद चषक माध्यमिक आश्रमशाळा सावरखेडा यांनी पटकाविले.

यावेळी या तालुका स्तरीय स्पर्धेत एकूण बावीस शाळांनी सहभाग घेतला होता. 

विशेष म्हणजे राळेगाव तालुक्यात माध्यमिक शाळेच्या तालुका स्तरावरील स्पर्धा पहील्यांदाच आयोजित केल्याबद्दल आनंदी आनंद दिसून येत होता.या खेळाचे बक्षिस वितरण संस्थेचे संचालक चित्तरंजन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे व संचालक मंडळ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना वाढोणकर, मोहन बोरकर यांनी केले तर आभार श्रावनसिंग वडते यांनी केले.त्याच सोबत दिनांक  21/1/2023 रोजी विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून राळेगाव तालुका स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत बत्तीस शाळांनी सहभाग घेतला होता.

त्यात प्रथम क्रमांक सैनिक पब्लिक स्कूल वडकी, द्वितीय क्रमांक नेताजी विद्यालय राळेगाव, तृतीय क्रमांक माध्यमिक कन्या शाळा वडकी, चतुर्थ क्रमांक इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव यांनी पटकावला.सोबतच प्रोत्साहनपर बक्षीस महाविर काॅंन्व्हेंट राळेगाव यांना देण्यात आले.

या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून रोशन डान्सिंग अकाडमी यवतमाळचे संचालक रोशन दुपारे व सहकारी यांनी परिक्षण केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिक्षक रमेश टेंभेंकर,दिगांबर बातुलवार, श्रावनसिंग वडते,रंजय चौधरी,राजेश भोयर,मोहन आत्राम,मोहन बोरकर,विशाल मस्के,शुभम मेश्राम,कुंदा काळे, वंदना वाढोणकर,स्वाती नैताम, वैशाली सातारकर, दिपाली कोल्हे, अश्विनी तिजारे,रूचिता रोहोणकर,वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...