आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या पार पडलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकी मध्ये नवख्या उमेदवाराला पसंती देत मतदाराने आपला कोल देत दिग्गजांना मात दिली.
आज मतमोजणी सुरू झाली आणि आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाले. मारेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत सरपंच,सदस्य पदाकरिता 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यात वेगाव, मार्डी, वनोजा, हिवरी, कोसारा, कानडा, नवरगाव, गौराळा, शिवणी या नऊ ग्रामपंचायत करीता निवडणूक घेण्यात आली. आज मंगळवार 20 डिसेंबर रोजी मतदान मोजणी प्रक्रिया पार पडुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. 9 पैकी 5 जागांवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले तर ऐका जागेवर आम आदमी पार्टीने एन्ट्री करीत तालुक्यात विजयी पदार्पण केले.
आज मंगळवारी निकाल लागला. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तालुक्यातील मोठी व प्रतिष्ठित ग्रामपंचायत असलेल्या वेगाव येथे सरपंच पदाकरिता उषा अनिल देरकर विजयी झाल्या. त्या काँग्रेस प्रणित पॅनल कडून उमेदवार होत्या. मार्डी येथे सरपंच पदाकरिता रविराज चंदनखेडे विजयी झाले. काँग्रेस प्रणित पॅनल कडून उमेदवार होते. वनोजा येथे सरपंच पदाकारिता डीमन गोवर्धन टोंगे विजयी झाल्या. त्या शिवसेना (ठाकरे) महिला उपजिल्हा संघटिका आहे. हिवरी येथे सरपंच पदाकरिता इंदिरा पिदूरकर विजयी झाल्या. त्या काँग्रेस प्रणित पॅनल कडून उमेदवार होत्या. कोसारा येथे सरपंच पदाकरिता छाया अंकुश खाडे विजयी झाल्या. त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलच्या उमेदवार होत्या.
कानडा येथे सरपंच पदाकरिता सुषमा रुपेश ढोके विजयी झाल्या. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रणित पॅनल कडून उमेदवार होत्या. नवरगाव येथे
सुचिता फुलू कुमरे ही आम आदमी पार्टीने एन्ट्री करीत विजयी पदार्पण केले.
ती गावकरी पॅनल कडून उमेदवार होत्या. गौराळा येथे सरपंच पदाकरिता मयुरी चंद्रकांत धोबे विजयी झाल्या. त्या ग्रामविकास पॅनल कडून उमेदवार होत्या. शिवणी येथे सरपंच पदाकरिता निलेश रासेकर विजयी झाले. ते महाविकास आघाडीच्या पॅनल कडून उमेदवार होते.
सरपंच पदी विजयी झालेल्या पॅनल मधुन बहुतांश सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीकारिता निवडणूक निर्णय अधिकारी संदीप वाघमारे, सुधाकर जाधव, आर. डी कांडळकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी करण कुडमेथे, विवेक राऊत, किरण मेश्राम यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...