Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / []मारेगावात प्रवाशी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

[]मारेगावात प्रवाशी निवारा तरी होईल काय?[] <>लोक प्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष <>आय व्ही आर सि एलचा प्रवाशी निवारा कुछकामी! तालुका प्रतिनिधी / मारेगाव.... मारेगाव शहराची तथा तालुक्याची वाढती लोकसंख्या व तालुका स्थळी होणारी प्रवाशांची गर्दी, यासाठी बस थांबा परिसरात प्रवाशी निवारा असणे आवश्यक आहे. प्रवाशी विद्यार्थी यांची होत असलेली फरपट पाहता बसस्थानक किंवा प्रवाशी निवारा आवश्यक असतांना यापैकी काहीही नसल्याने मारेगांव येथे किमान प्रवाशी निवारा तरी होईल का?असा भाबडा प्रश्न नागरीक, विध्यार्

[]मारेगावात प्रवाशी निवारा तरी होईल काय?[] <>लोक प्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष <>आय व्ही आर सि एलचा प्रवाशी निवारा कुछकामी!  तालुका प्रतिनिधी / मारेगाव....     मारेगाव शहराची तथा तालुक्याची वाढती लोकसंख्या व तालुका स्थळी होणारी प्रवाशांची गर्दी, यासाठी बस थांबा परिसरात प्रवाशी निवारा असणे आवश्यक आहे.  प्रवाशी विद्यार्थी यांची होत असलेली फरपट पाहता बसस्थानक किंवा प्रवाशी निवारा आवश्यक असतांना यापैकी काहीही नसल्याने  मारेगांव येथे किमान प्रवाशी निवारा तरी होईल का?असा भाबडा प्रश्न नागरीक, विध्यार्

[]मारेगावात प्रवाशी निवारा तरी होईल काय?[]

<>लोक प्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष <>आय व्ही आर सि एलचा प्रवाशी निवारा कुछकामी!

तालुका प्रतिनिधी / मारेगाव....

   मारेगाव शहराची तथा तालुक्याची वाढती लोकसंख्या व तालुका स्थळी होणारी प्रवाशांची गर्दी, यासाठी बस थांबा परिसरात प्रवाशी निवारा असणे आवश्यक आहे.  प्रवाशी विद्यार्थी यांची होत असलेली फरपट पाहता बसस्थानक किंवा प्रवाशी निवारा आवश्यक असतांना यापैकी काहीही नसल्याने  मारेगांव येथे किमान प्रवाशी निवारा तरी होईल का?असा भाबडा प्रश्न नागरीक, विध्यार्थी एकमेकात विचारुन मनोरंजन करुन घेत असल्याचे वास्तविक चित्र मारेगाव तालुक्यात पहावयास मिळत असुन याला लोक प्रतिनिधी तथा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरनाचा परिपाक म्हणने वावगे ठरु नये.

         प्रामुख्याने प्रवाशांना थांबण्यासाठी  निवाऱ्याचा प्रश्न दिवसागणिक जटील झाला असतांना त्यासाठी करण्यात आलेले आंदोलन त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करुनही सगळे प्रयत्न फोल ठरत असल्याने प्रवासी निवारा दिव्यस्वप्न ठरत आहे. यापुर्वि प्रशासनाकडुन दिलेले आश्वासन सुध्दा पुर्ण झाले नाही.त्यामुळे मारेगाव शहराला किंवा तालुक्याला कोणत्याही लोकप्रतिनिधी कडुन मिळेलेले आश्वासन पुर्ण होईलच अशी शक्यता  सध्यातरी धुसर होत आहे.

      नेहमीची वर्दळ व शासकीय निमशासकीय कामासाठी येणाऱ्या जनतेची मारेगाव शहरात गर्दी असते.मात्र प्रवाशांसोबत ,शालेय विद्यार्थ्यांनी थांबावे कुठे हा अनुत्तरीत प्रश्न प्रवाशांना सातत्याने भेडसावत आहे.

       तालूका स्थळ असलेल्या मारेगांव शहरात पदवी पर्यंतचे शिक्षण किंबहुना वेगवेगळ्या क्षेत्रात डिप्लोमा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी ग्रामिण भागातुन येणाऱ्या विद्यार्थी तथा विद्यार्थिनींची संख्या खुप असल्याने बस थांबा परिसरात असलेल्या वेगवेगळ्या दुकानाचा त्यांना आसरा घ्यावा लागत असल्याची मारेगाव तथा तालुक्यातील नागरिकांची शोकांतीका असतांना लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभुत ठरत असल्याचा आरोप होत आहे.

    शहरात किमान प्रवासी निवारा बस थांबा परिसरात उभारावा ही मागणी घेवून एका राजकीय पक्षाकडुन आंदोलन करण्यात आले. समाजासाठी किंवा तालुक्यातील जनतेसाठी काहीतरी समाजाभिमुख काम करण्याची लोकप्रतिनिधी,नेते पुढारी,यांची मानसिकता नसल्याचे मारेगांव शहर व तालुक्यातील जनतेएवढे कुणालाही माहीत नसावे. अनेक महीण्याचा, वर्षाचा कालावधी लोटला परंतु अजुनही प्रवाशी निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने "किमान प्रवाशी निवारा मारेगांवला होईल काय ?"असे म्हणायची वेळ तालुक्यातील नागरीकांवरती आली असुन प्रवासी निवारा हा प्रश्नही हवेत विरेल व डोकेदुखी वाढणार यात शंका नसली तरी बसथांबा परिसराच्या जवळपास दोनशे मिटर अंतरावर उभारण्यात आलेला आय व्ही आर सि एलचा प्रवासी निवारा कुचकामी ठरत आहे.

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...