आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ : शैक्षणिक गुणवत्तेत कमी असणा-या देशातिल १० जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण (मीड टर्म अचीवमेंट सर्वे) घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात.
भारत सरकारने २०१७ मध्ये देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी २०१७ मध्ये राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (नॅशनल अचीवमेंट सर्वे) घेतला होता. यामध्ये देशात १० जिल्हे हे कमी शैक्षणिक गुणवत्ता असलेले आणि 300 गुणांपेक्षा कमी गुण असलेले आढळुन आले. यात यवतमाळ जिल्ह्याला २९९ गुण मिळाले होते.
त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान समितीने २०२० मध्ये कमी गुणवत्ता आढळून आलेल्या या १० जिल्ह्यांमध्ये तात्काळ शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार भारत सरकारने मार्च २०२२ मध्ये या जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सुद्धा २७ ऑक्टोबर २०२१ ला 'निपुण भारत' हा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागांतर्गत राबवायला सुरुवात केली.
मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काही वाढ झाली की नाही हे तपासण्यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे (एनसीआरटी) मार्फत मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण अंतर्गत २२ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.
इयत्ता ३ री व ५ वी या इयत्तांची राष्ट्रीय संपादणूक पातळी तपासण्या करीता ही परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जिल्ह्यातील ९४ शाळांची निवड केली आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे कडुनच प्रश्नपत्रिका येणार आहे.
या परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डायटचे प्राचार्य डॉ.प्रशांत गावंडे, शिक्षणाधिकारी(प्राथ) यवतमाळ, श्री प्रमोद सूर्यवंशी तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, न.प. प्रशासन अधिकारी, प्रकल्प अधिकारी व समाजकल्याण अधिकारी उपस्थित होते. सदर परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी मागदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी परीक्षेच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद,आश्रम शाळा आणि खाजगी आस्थपनांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा सराव करुन घ्यावा, शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील याची नोंद घ्यावी. १० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरपर्यंत कोणीही शिक्षक शाळेत गैरहजर राहता कामा नये. १८ व १९ नोव्हेंबरला विशेष सराव चाचणी घेण्यात यावी अशा सुचना केल्यात. दरम्यान या परिक्षेच्या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील ४ शाळांचा पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत.
परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाचा सहभागात घेण्यात आलेला नाही. ९४ शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी मुख्य नियंत्रक अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण प्रशांत थोरात यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिका शाळेत पोहोचविण्यासाठी १२३ नियंत्रण अधिकारी नेमले आहेत. त्याचबरोबर क्षेत्र अन्वेषक म्हणून ११२अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...