Home / यवतमाळ-जिल्हा / नियमित कर्जफेड करणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०  हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ
ads images
ads images
ads images

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ।। शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी -पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ :- शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन काम करीत आहे त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने प्रोत्साहन पर लाभ योजना जाहीर केली होती.

Advertisement

आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर लाभाची रक्कम जमा करण्यास सुरूवात केली असून संकटात असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही  पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ मिळालेल्या  पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पुष्पुगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

या सर्व शेतक-यांच्या खात्यात ५० हजार  रुपये लाभ जमा करण्यात आला.  यावेळी श्री राठोड शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी आमदार सर्वश्री डॉक्टर संदीप धुर्वे, अशोक उइके,  निलय नाईक ,नामदेवराव ससाने तसेच संजीव रेड्डी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.

 

सन २०१७-१८, २०१८-१९, आणि सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिलेल्या मुदतित पूर्णतः परतफेड केलेल्या शेतक-यांना सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पिक कर्जाच्या मुद्दल रकमेवर ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.

 

आज जिल्ह्यातील मोजक्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये झरी जामणी येथिल व्यंकट कुळसुंगे, यवतमाळ येथील प्रफुल्ल खंडाळकर, महागाव येथील अनिल देशमुख ,घाटंजी येथील नंदकिशोर वाटीले, उमरखेड येथील रामकृष्ण सोनटक्के, दिग्रस येथील पुष्पा चव्हाण, प्रल्हाद भगत ,मारेगाव येथील रवींद्र लेडांगे,राळेगाव येथील मोहन मेश्राम, बाभुळगाव येथील राजेश देशमुख या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

जिल्ह्यात बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर एक लाख १४ हजार ७६८ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ६५ हजार ३६४ लाभार्थ्यांची यादी जिल्हाला प्राप्त झाली आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रमाणीकरण केलेल्या खातेदारांची संख्या ५७ हजार ७०६ राष्ट्रीयकृत बँकांचे सहा हजार 83 आणि ग्रामीण बँकेचे  एक हजार ४६९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...