Home / यवतमाळ-जिल्हा / पुसद / *स्मृतीदिन* *मा.कांशीराम...

यवतमाळ-जिल्हा    |    पुसद

*स्मृतीदिन* *मा.कांशीराम साहब* .................*की* *कहाणी बिस साल पुराणी

*स्मृतीदिन*    *मा.कांशीराम साहब*  .................*की*  *कहाणी बिस साल पुराणी
ads images
ads images
ads images

*

Advertisement

 

 

"""""""""""""""""""''''''""""""""""""""""

         ✍याडीकार,पुसद9421774372

 

*************************

*मै शादी नहीं करूगां और अपने घर नहीं जावुगां एक पँट और एक शर्ट लेके निकले मा.कांशिराम साहबने अपने कणखर विचारोसे राजकीय क्षेत्रमें हडकम मचादीं पुरे जिवन में ना बँक खाता खुलवाया,ना घर लिया,ना गाडी ली, बहुजनो का घरही अपना घर समजनेवाले बहुजन नायक मां कांशिराम साहेब के स्मृतीदिनी  विनम्र अभिवादन????????*.।।

 

नागपूर येथे नोव्हेंबर 2000 मध्ये बामसेफ  कर्मचारी आणि कार्यकर्ते यांची कार्यशाळा असल्याने आम्ही तयारी केली.खरंतर वणी येथील बसपाची टिम यवतमाळ जिल्यात आघाडीवर होती.मी बंजारा समाज कर्मचारी संघटनेचा जिल्हा सचिव असल्यामुळे नाना मेश्राम ग्रामसेवक यांनी मला  शुद्धा नागपूर ला येण्याचे सांगितले. मी होकारही दिला.आणि बसपा संघटक.प्रा.धाबरडे सर,तालुका संयोजक गणेश रामटेके,नाना मेश्राम व इतर. बसपा मंडळी सह आम्ही नागपूर कडे निघालो. प्रवाशात *मा.कांशीराम साहेबाच्यां* अनेक पैलुवर आणि उंत्तुग व्यक्ती महत्त्वावर चर्चा झाली. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध जंयतीची सुटी केंद्र सरकारने रद्ध केल्याच्या निषेधार्थ त्यांनी नोकरी चा राजीनामा दिल्याचे आन् आयुष्य भर आपल्या घरी न जाण्याची शपथ घेऊन बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी च त्यांनी  *एकला चलोरे चा मार्ग निवडला होता*  एवढीच माहिती होती.पंरतु प्रवासात  मा.कांशीरामच्या संघर्षमय जिवनचरित्राची माहिती मिळाली. आणि त्यांना जवळुन पाहण्याची उत्सुकता वाढली. नागपूर येथे वेळेवर पोहचलो .इंजीनिअर असोसिएशन यांनी बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने असलेल्या सुंदर  प्रशस्त हाँल मध्ये प्रवेश केला. आणि तेथील. व्यवस्था पाहून थक झालो.प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प देवुन सर्वांचे स्वागत करीत होते.आतमध्ये सर्व शिस्तीत बसले होते.बंगलोरहुन आलेल्या माणसाचे अंत्यत.सुरेख संचालन सुरु होते. मा.कांशीराम साहेब केव्हा विचारपिठावर येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली.होती... प्रतिक्षा संपली...बहुजनांचा बुंलद आवाज मा.कांशीराम साहेब संर्वाना अभिवादन ????????करत  विचारपिठावर स्थानापन्न झाले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (नांव आठवत नाही) यांनी साहेबाचे.स्वागत करून आपल्या प्रास्ताविकाला सुरुवात केली. त्यांचे प्रास्ताविक सुरू. पंरतु मा.कांशीराम साहेब  यांना डोळयात साठविणे सुरू असल्यामुळे त्यांनी प्रास्ताविकात काय बोलत होते कुणाचे ही लक्ष नव्हते. मा.कांशीराम साहेब भाषणासाठी उभे झाले. सर्वांनी आपापल्या जागेवंर उभे राहून अभिवादन करत टाळयांचा गडगडाटात पुन्हा एकदा स्वागत करण्यात आले.फोटो मधल्या पोज नुसार त्यांनी हाता मध्ये बाँलपेन धरून आपल्या भाषणास सुरुवात केली..आपका हक् मनुस्मूतीने छिणा है.हजारो सालोसे हमको अच्छा जिवन बितानेका,शिक्षा का कोयी हक नहीं था.।।अपनी लढाई अपनेकोही लढणा है.इसलिए मै.1984 मे.बहुत संघर्ष के बाद बहुजन समाज पक्ष की स्थापना की है.।। संपूर्ण बहुजन समाज पक्षाचा वाटचालीचा जणू आढावाच घेतला. उतरप्रदेशात कुशलतेने आघाडी चे राजकारण करून 1995  मध्ये आपल्या पक्षाची सत्ता आणली.आणि स्वतः मुख्य मंत्री न होता  मा.मायावती बहन कडे मुख्यमंत्री पद सोपविले. *सत्ता वो चाबी है जो हर समश्या का ताला खोल देती है* असा भारदस्त आवाज दोन.बोटातील बाँलपेनची सतत हालचाल करत उपस्थित बामसेफ/ बसपा  कार्यकत्यांना ते प्रेरणा देत होते. साधा पांढरा हाफ शर्ट  आणि निळ्या रंगाची पँट यावर ते अंत्यत प्रसन्न दिसत होते. आजुबाजुच्या सुटाबुटातील व्यक्ती त्यांच्या समोर फिक्या पडल्या होत्या.इतका हा साधा माणुस खिशात कवडीही नंसताना आणि कोणताही राजकीय वारसा नंसताना एवढी राजकीय भरारी कशी मारली असेल? हा प्रश्न त्या सभागृहात अनेक व्यक्तीनां कदाचित त्यावेळी सतावत असेल. त्यांच्या. बोलण्यातील तळमळ,बहुजन आणि मनुस्मूती याबद्दल असलेला गाढा अभ्यास आणि त्याग वुत्तीच त्यांना यशोशिखर गाठण्याकडे कारणी पडली असे मनोमन वाटतं होते. त्यांचे भाषण ऐकतांना अंगावर काटे येत होते.खरंच ज्या समाजातुन.आपण आलो त्यांचे काही देणे लांगते.हे मात्र पके फिट झाले होते.माणुस भारावुन गेला होता. पुण्यातील नौकरी सोडली.ठरलेले लग्न ही मोडले. अविवाहीत राहण्याची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश येथे राजकीय चळवळी वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. संपूर्ण जिवनच त्यांनी दावावर लावले होते. *अपनी लढाई अपनेकोच लढणा है.।।संघर्ष करना होगा उसके शिवाय आपणा हक मिलनेवाला नहीं है*.।। असे सांगुन आपल्या भाषणाचा समारोप केला.मनातल्या मनात धन्यता वाटली.आणि येथे आल्याचे सार्थक झाले. ऐवढयात वानखेडे सभागृहात मा.कांशिराम साहेब यांचे सांयकाळी  कार्यक्रम असल्याचे ध्वनी क्षेपणावरुन कळले. वेळ असल्यामुळे  आम्ही मित्रमंडळी बरडीवर काही खरेदी करत अंसताना  मा.कांशिराम साहेब यांना 25 ते 30 गाडयांच्या ताफयासह अंत्यत कडक सुरक्षा कवचातुन जात अंसताना आम्ही पाहीले. आणि खरेदी बंद करून या दुसऱ्या कार्यक्रमाकडे जायला निघालो. याच बरडीवर काही वर्षापूर्वी मा.कांशिराम साहेब यांना  भाडयाच्या सायकलचे दोन रूपये सुद्धा देण्यासाठी खिशात पैसे नव्हते. त्याच रस्तयावरुन एवढया मोठ्या गाडयांच्या ताफयात मा.कांशिराम साहेब जात असल्याचे पाहून डोळे???????? पाणावले.खंरच माणसाने मनात आंणल तर काहीही होवु शकते..कर्तुत्व आणि जिद्ध माणसाला यश मिळवुन देते.आम्ही कार्यक्रम स्थळी पोहचलो.विचार मंचावर सर्व च संघटनेचे पदाधिकारी बसले होते.माझ्या ही नावाची एका वणीच्या कार्यकर्ते यांनी  बंजारा कर्मचारी संघटनेचा सचिव या नांत्याने नांव सुचविले. मी हार अर्पण???????? करून बसलो.कार्यक्रम सुरेख झाला. त्यांनंतर  रात्री जाहीर सभा झाली. प्रंचड गर्दी, निळ्या गणवेशातील कार्यकर्ते लक्ष वेधुन घेत होते.गोवळकरगुरुजी च्या नागपूरात मा.कांशिराम साहेब यांनी मनुस्मुतीवर सडेतोड टिका करतांना  मी प्रथमच पाहात होतो. याच नागभुमीत  हजारो वर्षापासून अस्पुशयांचा पायातील.साखळदंड तोडुन बौद्ध धम्माची दिक्षा दिली त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मा.कांशिराम साहेब  वारसा पुढे नेत होते असे मनोमन वाटत होते.या महाराष्ट्र मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या.पंरतु दलित समाज हा एकत्र आलेला दिसून येत नाही. अशीही खंत त्यांनी त्यावेळी व्यक्त केली. आणि रिपब्लिकन नेत्यांना खडे बोल सुनावले.आणि टाळयांचा गडगडाट झाला. मी मागे वळुन पाहीले तर रिपब्लिकन नेते *टाळया* वाजवत असल्याचे दिसले.साधी एखादी चुकीची ओळही पेपरात आली तर धिंगाणा घालणारे,बंद पुकारणारे रिपब्लिकन अनुयायी आज मात्र मा.कांशिराम साहेब समोर गप्प बसले होते. बहुजन समाजाचे हित समजावुन सांगत त्यांनी एक खालील शेर सांगितला,

 

*बच्चा बच्चा किसका*.।

*रामविलास पासवान टिम का*।।

*रामविलास पासवान किसका*

*भाजपा/आघाडी टिम का।।*

सभा संपली .जथेच्या जथे बाहेर पडत होते.मि.लग्न करणार नाही, आपल्या घरी जाणार नाही अशी कठोर प्रतिज्ञा करून एक शर्ट एक पँट घेवून बाहेर पडलेला हा बहुजन नायक सायकल चे दोन रूपये भाडे देण्याची सोय नसंताना आपल्या कणखर विचाराने राजकीय क्षेत्रात बहुजनाना मुख्यमंत्री पदा पंर्यत नेतो.असे बहुजनाचे बुलंद आवाज मा.कांशिराम साहेबाना विनम्र अभिवादन????????????????????????????????

 

बहुजन  संघटनेच्या  काही   मुखीयांनी   संघटनेच्या  पैसाचा गैरवापर न करता,अंहकारात न जगता मा.कांशिराम साहेबांचा आदर्श जरूर ध्यावा.जेणेकरून संघटना फुटनार नाही.????????

✍याडीकार,पुसद.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पुसद तील बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा खासदार भावना गवळी यांच्या हस्ते साडी देऊन केला सन्मान

यवतमाळ: नवरात्र उत्सवानिमित्त मान मातेचा खेळ रंगला साडीचा त्यात 80 महिला विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या माता...

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* ✍️गजानन...

*विचाराचं ,ज्ञानाचं खंर सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी. !*

भारतीय वार्ता :पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री. *✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372 काल दसरा आणि धम्मचक्र...