भारतीय वार्ता :गौरव लोडे (बाबुळगाव )यवतमाळ : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थी भूषण घोडके, गौरव लोडे , लोभेश ताजने , तन्मय काकडे ,कुणाल राणे यांनी चिमणा बागापूर येथील शेतकऱ्यांना फवारणी बाबत मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने फवारणी करताना शेतकऱ्यांनी किटचा ( मास्क, ग्लोज, गॉगल) योग्य वापर, फवारणी मध्ये वापरले जाणारे कीटकनाशक, तणनाशक मधील घातक विषाणूमुळे शेतकऱ्यांच्या प्रकृतीवर विषबाधा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. वी. कडू, कार्यक्रम अधिकारी एस. वी. महानूर, आणि विषयतज्ज्ञ प्रा. एस. भोयर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास चिमणा-बागापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.