आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
झरी:- संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्रातील ओबिसी,एसबिसी,व्हिजेयेन्टी विद्यार्थी मात्र उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ३६ जिल्ह्यातील ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करा अशा मागणीचे निवेदन आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी वणी तहसीलदार यांचें मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की विदर्भातील सर्व सामाजिक ओबिसी,विजेएनटी,एसबीसी, संघटनांच्या माध्यमातून ७ ऑगस्ट रोजी मंडल यात्रा काढण्यात आली,ही यात्रा नागपूर येथून निघून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ,वर्धा, असे मार्गक्रमण करीत नागपूर येथे समाप्त झाली.
यात्रे दरम्यान १५ हजारांचे वर सामान्य ओबिसी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये ३६ ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व इतर महत्त्वाच्या मागण्या साठी विचारना केली गेली त्यात ग्रामीण भागात शिक्षणाच्या व रोजगाराची सोय उपलब्ध नसल्यामुळे ओबीसी च्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात हि मागणी सर्वसामान्य ओबीसीची होती, आपल्या सरकारने ओबीसी चे हक्क व अधिकार द्यावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी,विजेएनटी,एसबीसी समुदायातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण प्राप्त करण्यास अनेक अडचणी येतात उच्चशिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना शहरात जावे लागते,त्यांना शहरातील खर्च परवडणारा नाही.त्यामुळे वसतीगृहे तात्काळ सुरू करावी, मागील महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या ३० जानेवारी२०१० रोजी शासन आदेशानुसार ओबीसी,विजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ वसतीगृहा साठी माण्यता मीळाली होती, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात बहुजन कल्याण मंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या की प्रत्येक जिल्ह्यात मुलामुलींसाठी दोन स्वातंत्र असे ७२ वसतिगृहे होतील परंतु आज चार वर्षे पूर्ण झाली असून वसतीगृहे सुरू झाली नाही.
तरी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा नाईलाजास्तव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते असा इशारा निवेदनातु देण्यात आला.यावेळी जनगणना कृती समितीचे समनव्यक आशिष साबरे, गणेश बुट्टे, संजय चामाटे, राजू गुरनुले,यासह वणी,झरी,मारेगाव येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...