.
भारतीय वार्ता :दिनांक 11/08/2022 रोजी रक्षाबंधन या सणानिमित्त स्व.खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य लाकडे सर, प्रमुख पाहुणे काझी सर, प्रमुख वक्ते परचाके मॅडम, मार्गदर्शक कडु मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी रजनीकांत फुटाणे, सुनील कांबळे, उमाकांत तेलंगे,व उपस्थित विद्यार्थी यांच्या समवेत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती स्वातंत्र्य सेनानी मा. तुळशीरामजी दूधकोहळे यांना आमंत्रित करून मुलींच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्यांना राखी बांधून साजरा करण्यात आला तसेच हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत रॅली सुद्धा काढण्याचे नियोजन करण्यात आले.. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि.13/08/2022 पासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि फडकवीत असताना केसरी रंग वर राहील याची काळजी घ्यावी तसेच 15/08/2022 ला संध्याकाळी राष्ट्रध्वज उतरवावा, ध्वजसंहितेचे पालन करावे असे आवाहन लाकडे सर यांनी केले... राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही असे कृत्य करू नये .ह्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.