Home / यवतमाळ-जिल्हा / ‘हर घर तिरंगा’ अभियानात...

यवतमाळ-जिल्हा

‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवा...

‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवा...
ads images
ads images
ads images

• सायकल रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांचा नागरिकांना संदेश

Advertisement

 

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 किलोमीटर सायकल रॅली•

 

• उमरी हुतात्मा स्मारकाला अभिवादन

 

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ : ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी उत्सफुर्तपणे सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून केले आहे.

जिल्हा प्रशासन, नगरपालीका, यवतमाळ सायकल क्लब व क्रिडा भारती सायकलींग ग्रुप यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त  75 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी ललिलकुमार वऱ्हाडे, तहसिलदार कुणाल झाल्टे, प्रदिप मानकर, यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी तसेच सायकलींग ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते.

ही रॅली समता मैदान यवतमाळ येथून निघून उमरी येथे पोहचली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले तसेच या स्मारकात स्वात्रंत्र्य सेनानींच्या छायाचित्रासोबत त्यांची माहिती लावण्याचे व स्मारकाच्या देखभालीसंदर्भात संबंधीतांना सूचना दिल्या. पुढे बाभुळगाव, नायगाव, वेणी, कोटा, कळंब, चापर्डा मार्गाने येतांना या गावात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तिरंगा विक्री केद्राचे उद्घाटन व नागरिकांना तिरंग्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी कळंब येथे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार सुनिल चव्हाण व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

याचप्रसंगी जिल्हा प्रशासन व यवतमाळ नगरपरिषदेद्वारे शहरात देखील सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समता मैदान येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवी झेंडी दाखवुन या सायकल रॅलीचा प्रारंभ केला. ही रॅली यवतमाळ शहरातील हनुमान आखाडा चौक, पाच कंदील चौक, जाजु चौक, हिंदी हायस्कूल, विर वामनराव चौक, दाते कॉलेज, आर्णी नाका चौक, संविधान चौक, मेडीकल चौक, वाघापुर नाका, स्टेट बँक चौक, कॉटन मार्केट चौक असे मार्गक्रमण करत या सर्व चौकातील स्मारक व महापुरुषांच्या प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन केले.

सायकल रॅलीत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या नेतृत्वात हौशी सायकलस्वार तथा न.प.चे शालेय विद्यार्थी शिक्षक शिक्षिका, अंभ्याकर कन्या शाळा सायकल चमु, महसुल कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दोन्ही रॅलीची सांगता यवतमाळ येथे समता मैदानात (पोस्टल ग्राऊंड) करण्यात आली.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...