आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख,मारेगाव:- आधार कार्ड विना प्रसूती करिता ग्रामीण रुग्णालय मारेगाव ने परत केलेल्या भटक्या जमातीतील एका गर्भवती महिलेस अखेर जनहित कल्याण संघटना व क्रांती युवा संघटना ऐन वेळेवर वेदनेच्या विव्हळेतअसतांना तिच्या मदतीला धावून गेली.व तिला लोढा हॉस्पिटलमध्ये तत्काळ भरती केले असता तिने एका गोडस बाळाला जन्म दिला व दोघेही आता सुखरूप असल्याने तिला जनहित व क्रांती संघटनेमुळे अखेर आधार कार्ड विना आधार दिला.
शहरात आंबेडकर चौक परिसरात एका लोहार भटक्या समाजातील कुटूंब लोखंडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय रस्यावर गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.दरम्यान अर्चना सोळंके नामक गर्भवती महिला प्रसूतीच्या वेदनेत कळा तिला असह्य होत असल्याने तिच्या कुटूंबानी तिला घेवून थेट ग्रामीण रुग्णालय गाठले असता तिचे आधार कार्ड नसल्याने तिला परत पाठवले.तिच्या वेदनेला पाहून तिचे कुटूंब इकडे तिकडे शहरात फिरून मदतीची भीक मागत होते.परंतु तिच्या मदतीला कोणीच जात नव्हते.
दरम्यान ही बाब जनहित कल्याण संघटना मारेगाव व क्रांती युवा संघटना वणी च्या पदाधिकाऱ्यांना लक्षात येताच कुठलाच विलंब न करता त्यांनी थेट वणी येथील प्रसिद्ध लोढा हॉस्पिटलमध्ये भरती केले.
परंतु त्या नवजात शिशुने गर्भातच शौच केल्याने अंत्यत नाजूक परस्तीती होती.मात्र डॉ. महेंद्र लोढा यांनी ती परस्तीती हाताळत शस्त्रक्रिया करून तिला व बाळाला सुखरूप ठेवले.यावेळी तिचा संपूर्ण खर्च जनहित व क्रांती संघटनेने केला.
ग्रामीण रुग्णालय ने तिला आधार कार्ड विना प्रसूतीस नकार देवून तिला परत केले मात्र जनहित कल्पना व क्रांती युवा संघटनेने तिला मदतीचा आधार दिल्याने ती धन्यता मानत आहे.
यावेळी राकेश खुराणा,गौरीशंकर खुराणा,ऍड. सुरज महारतळे,विजया ताई कांबळे,समीर कुलमेथे,रॉयल सयद,निलेश तेलंग,प्रफुल ऊरकडे, गौरव आसेकर,धीरज डांगाले,राजू गव्हाणे आदी जनहित कल्याण व क्रांती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या मदतीसाठी परिश्रम घेतले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...