Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मोदीची सत्ता सामान्याचा...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मोदीची सत्ता सामान्याचा जीव घेणारी ।। मारेगावात कांग्रेसचे महागाई विरोधी आंदोलन

मोदीची सत्ता सामान्याचा जीव घेणारी ।। मारेगावात कांग्रेसचे महागाई विरोधी आंदोलन

रास्ता रोको करून नेते, कार्यकर्त्यांनी स्वतःला करून घेतली अटक

दिलदार शेख,/मारेगाव: केंद्र सरकारचे धोरणे हुकुमशाही कडे वाटचाल करीत असुन महागाई चरमसिमेवर पोहचली असल्याने सामान्य जनतेचे आर्थिक बजेट आवाक्याबाहेर गेले,महागाईवर केंद्र शासनाचे जाणिवपुर्व दुर्लक्ष जिवनावश्क वस्तुवर भरमसाठ जि एस टी लाऊन सामान्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याच काम शासना कडुन  होत असल्याने मारेगाव तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने महागाई व इतर समस्या घेऊन राज्यव्यापी आंदोलन मारेगाव येथे वणी यवतमाळ रोडलगत पोलीस स्टेशन समोर सकाळी ११ वाजता सुरु केले ,ह्या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव कासावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे,माजी महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केले.

राज्यात व देशात महागाईने सामान्य जनता हैरान असताना, केंद्र सरकार सत्तेसाठी विविध षडयंत्र करुन जनतेला वार्यावर सोडले, पेट्रोल डिझेल सह अनेक जिवनावश्यक वस्तुचे भाव गगणाला गेले ,त्यावर केंद्र सरकार जि एस टी लाऊन जनतेला लुटण्याचा डाव आखित असुन अशा लुटारु केंद्र शासनाचा निषेध नोंदवीत सामान्य जनतेचे जगने सुकर व्हावे यासाठी शासनाने महागाई आटोक्यात आणावी अन्यथा जनता येणाऱ्या निवडणुकीत लुटारु शासनाला जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा आंदोलनातुन उपस्थित कांग्रेस नेत्यांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदवित दिला, सध्या महाविकास आघाडीच्या सरकार मधुन ईडीचा धाक व धनाचे आमिष दाखवित सरकार पाडले हे षडयंत्र भाजपा मधील शकुनीमामाचे असुन जनता पुढे महाराष्ट्राशी गद्दारी करणार्यांना माफ करणार नाही असा इशारा उपस्थितानी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला. 

यावेळी काँग्रेसचे ओम ठाकुर , कांग्रेस शहर अध्यक्ष शंकरराव मडावी , कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमन डोये, रवी धानोरकर, यादवराव पांडे , अंकुश माफुर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, वसंतराव आसुटकर,शंकुतला वैद्य, नगरसेविका किनाके,धनंजय आसुटकर सह कांग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॉक्स

काही वेळेसाठी मारेगाव काँग्रेसच्या वतीने मार्डी रोड चौकात  यवतमाळ, वनी राज्य महामार्गवर रास्ता रोको करून ,नेते, कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...