आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): विशेष राजकीय विश्लेषण....
तालुका राळेगांव मधील तीन जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांच्या अपेक्षे पेक्षा जास्त चं मस्त निघाल्या ने सर्व इच्छुक जाम खुश झाले आहेत.
०७ जळका जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास वर्ग (ओ.बी.सी.)साठी, ०८ खैरी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण साठी, तर ०९ झाडगांव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण साठी आरक्षित निघाल्या ने इच्छुक कार्यकर्ता मंडळी पेक्षा अजून ही पद लालसा असलेल्या प्रमुख नेते मंडळी ना आतून खूप मोठ्या आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे "फेस रिडींग" वरुन जाणवतं आहे हे विशेष.
तीन जिल्हा परिषद गटाची जळका सोडून फक्त नावं बदलली.सर्व संरचना,त्या मधील गावं जैसै थे च आहे. वरध जिल्हा परिषद गटाचे नाव झाडगांव तर वडकी जिल्हा परिषद गटाचे नाव खैरी एवढाच काय तो बदल करण्यात आला आहे.
मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाला जिल्हा परिषद तीन गटातून दणदणीत विजय पदरात पडला, फक्त सक्षम,आर्थिक दृष्ट्या व जातीय निहाय समीकरणात बसणारे उमेदवार मिळाल्या मुळे म्हणा की ऐनवेळी इतर राजकीय पक्षां कडून आयात केल्या मुळे विजयश्री मिळाली होती. काँग्रेस पक्षात असलेल्या मोठ्या गटबाजी चा मोठा लाभ भाजपा ला आयता च मिळाला होता.
या वेळी मात्र परिस्थिती जरा काँग्रेस आणि भाजपा साठी निराशाजनक च दिसत आहेत. मुख्य कारण म्हणजे ते च ते चेहरे. वयाची पासष्टी ओलांडली तरी सत्तेचा, खुर्ची चा मोह मात्र सुटत नसल्या ने नवतरुण मग तो अपक्ष असो की राजकीय पक्षांचा तो ऐनवेळी बाजी मारेल अशाच चर्चा गावपातळीवरुन ऐकावयास मिळत आहे. दोन गट सर्वसाधारण तर एक गट ओ.बी.सी.साठी आरक्षित निघाल्याने,अनुसूचित जाती जमाती मधुन इच्छुक उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे. कारण आता कोणताही राजकीय पक्ष यांना विचारात घेणार नाही. काँग्रेस पक्षात तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती दुसऱ्या फळीच्या नेत्यांना अजिबात नाही.
भाजपा मध्ये ही जवळपास हीच परिस्थिती शेवटच्या क्षणी दिसू शकतेय. सध्या राळेगांव तालुक्यात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे चा देखील जनाधार भरभक्कम वाढलेला आहे,याची प्रचिती नुकत्याच संपन्न झालेल्या सोसायटी व नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत आली आहे.अजून ओबीसी आरक्षणाचे "फुल ॲन्ड फायनल" झाले नाही त्या नंतर चित्र अजूनही वेगळे च राहील यात शंकाच नाही हे विशेष...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...