आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.या पडलेल्या पावसामध्ये वरूड गावाचे सुद्धा खूप नुकसान झाले असून यामध्ये वरूड तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे व नाला अरूंद असल्यामुळे व ओव्हरफ्लो पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे गावात व तांड्यातील घरात व आजूबाजूच्या शेतात पाणी घुसून अतोनात नुकसान झाले असून या बाबतीत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर राळेगावचे मुख्य तहसिलदार डॉ. कानडजे यांनी दखल घेतली असून आज दिनांक 25/7/2022 रोजी वरूड जहांगीर गावाला भेट देऊन पाहणी केली व तेथील समस्या समजून घेतल्या.
त्यावेळी वसंत जिनिंगचे संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य रामधन राठोड यांनी गावकऱ्यांच्या वतीने समस्या मांडल्या.त्यामध्ये येत्या हंगामात तलावातील गाळ काढणे गरजेचे आहे असे सांगून ओव्हरफ्लोचा विसर्ग नाल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्यामुळे तलावाच्या ओव्हरप्लोपासून वरूड गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत नाल्याला गावाच्या बाजूने संरक्षण बांध आवश्यक असल्याचे सांगितले.
सोबतच वरूड जहांगीर येथील शेतकऱ्यांना नाला पार करून पलीकडे शेतीसाठी नेहमी जावे लागत असून तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर नाल्यातील रपट्यावरून मांडीभर , कंबरभर पाणी रहात असून त्यामुळे पलीकडे जाणे शक्य नसून पलीकडे गेलेही तरी मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाने रस्त्याचे मातीकाम करून केलेला तमाशा सुद्धा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्याच तलाठी यांनी केलेल्या पुरग्रस्त लोकांच्या सर्वैक्षण मध्यें खऱ्याखुऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा. हा सर्व विषय तहसीलदार साहेबाजवळ कथन केल्यानंतर मुख्य तहसिलदार डॉ. कानडजे साहेब यांनी याबाबत योग्य ती चौकशी करून योग्य पावले उचलली जाईल व सोबतच काही महत्वाच्या विषयावर संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.
त्यामुळे उपस्थित लोकांचे समाधान झाले असून त्यावेळी मंडल अधिकारी कर्णेवार, पोलिस पाटील नरेश चव्हाण, माजी उपसरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य रामधन राठोड,बळीराम जाधव,मनोज राठोड यांचे सह गावातील गणमान्य नागरिक व पुरग्रस्त लोक उपस्थित होते. गावातील घरांचा व बुडीत क्षेत्रातील शेताचा सर्वे करत असताना खऱ्या लाभार्थ्यांना बाजूला ठेवून बोगस लाभार्थी निवडीची यादी केल्याची शक्यता नाकारता येत नाही.ही यादी एका ठिकाणी बसून ठराविक लोकांच्या मनाने केल्याची शंका असून शक्य असल्यास परत एकदा सर्वे करण्याची मागणी गरजू लाभार्थ्यांनी केली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...