संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी यवतमाळ व आपत्ती व्यवस्थापन याच्या कडे स्कायमेट यांचे हवामान अंदाजानुसार जिल्हयात काही तालुक्यात दिनांक २६ जुलै २०२२ ला विजांचा कडकडासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे कळविले आहे . करीता जिवीत व वित्त हानी टाळणेकरिता दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे वतीने उपजिल्हा अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यानी नागरिकांना आवाहन केले आहे . ● या वातावरणात बचाव करण्यासाठी काही सूचना देऊ केल्या असून वादळी वारा विजा चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे खिडक्या , कुंपणापासून दूर करा, मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे, नैसर्गीक वीज पडून मोठया प्रमाणात जिवीत व वित्त होत असते , नैसर्गीक वीज पडून / पुरात वाहुन जावून होणारी जिवीत व वित्त हानी टाळणेकरिता पुढिल प्रमाणे दक्षता घेण्यात यावी . या वातावरणात घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा - याच्या ठिकाणाकडे ( मजबूत इमारतीकडे ) प्रस्तान करावे, ट्रॅकटर्स , शेतीची अवजारे , मोटरसायकल , सायकल यांचेपासून दूर रहा गाडी चालवत असल्यास , सुरक्षित स्थळी जाण्याचा प्ररयत्न करा उघडयावर असल्यास , शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुढग्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे . जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा,मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा, जंगलामध्ये दाट , लहान झाडाखाली , उताराच्या जागेवर निवारा घ्यावा, इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा, घरात असल्याम, वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास त्वरीत रुग्णवाहीका व वैद्यकिय मदत बोलवा,वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या,त्याला हात लावण्यास धोका नाही, ओल्या व थंड परीस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा , जेणेकरुन हायपोथेरमीयाचा ( Hypothermiya ) / शरीराचे अति कमी तापमान ) धोका कमी होईल, प्रमाणे इजा झालेल्या इसमास हाताळताना श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान ( Mouth - to - Mouth ) प्रक्रिया अवलंबावी, हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR करुन सुरु ठेवा अस्या काळजी न करता जीव वाचवण्यासाठी कृती करा, दुसऱ्यास मदत करा असे आव्हान करून. *काय करु नये * या वर सूचना केल्या त्या समोरील प्रमाणे गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर टेकडीवर मोकळया जागांवर समुद्र किनारी , स्वतंत्र झाडे , रेल्वे / बस / सहलीची आश्रय स्थाने , दळणवळणाची टॉवर्स , ध्वजाचे खांब , विद्युत दिव्यांचे खांब धातूचे कुंपण , उपडी वाहने आणि पाणी या ठिकाणे थांबणे टाळावेत . वायरद्वारे जोडले गेलेले फोन / मोबाइल व इतर इलेक्ट्रीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका, या दरम्यान आंघोळ करणे , हात धुणे , भांडी धुणे , कपडे धुणे , ही कार्ये करु नयेत,कॉक्रीटच्या ( ठोस ) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये, प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा ( धातूची दारे , खिडक्यांची तावदाने , वायरींग व इलेक्ट्रीक मिटर ) • घराबाहेर असल्यास 02 २. मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नका,. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, अधांतरी लटकणा - या लोंबणा - या ( cables ) पासून लांब रहुन हे न करण्याचे आव्हान केले, जीव अनमोल असून काय करावे व काय करू नये हे मनावर घेऊन आपल्या जीवा सह इतरांच्या जीवाची काळजी करा असे आव्हान उपजिल्हाअधिकारी ललित वऱ्हाडे यानी केले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...