आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ :- भारतीय डाक विभागाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करुन प्रति वर्ष 299 किंवा 399 च्या हप्त्यात विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले आहे. टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही नवीन योजना आणली आहे. ही योजना 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती.साठी आहे.
या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी पोस्टमन घरोघरी जाऊन नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घेणार आहेत. यात विमाधारकाचा अपघाती मृत्यु, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल, शिवाय रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजारांपर्यंत दावा देखील करता येईल. त्याच बरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपया पर्यन्त खर्च देखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यु झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार व विम्याअंतर्गत किमान दोन मूलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम मिळणार आहे.
299 व 399 हप्ता योजनेतील फरक : या दोन्ही योजना सारख्याच पण 399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखांपर्यंतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसांपर्यंत प्रतिदिवस 1 हजार रुपये मिळतात. वाहतूक खर्च 25 हजार व मृत्यूनंतर 5 हजार अत्यसंस्कारासाठी मिळतात. मात्र 299 च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च लागू नाही.
यांना ही योजना लागू नाही : साहसी खेळामध्ये सहभाग आदी, लष्कर, नौदल, हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती, आरोग्यासंदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती आजार- अपंग मुळे अपघात. उपचार करणारे डॉक्टर स्वत: विमाधारक किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाचा जवळच असेल, आत्महत्या, इत्र, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात, बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान, खाण कामगार, बांधकाम कामगार, ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, विषारी, स्फोटक इतर गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसतांना रुग्णालयात घेतलेला उपचार.
या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा असून वर्ष संपल्यानंतर जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात विमा नूतनीकरण करावे लागेल. या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल्यास इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर नव्याने खाते काढून योजनेचा लाभ घेऊ शकेल.
ही योजना टाटा एआयजीने सुरु केली असून टपाल खात्याने त्यांच्याशी करार केला आहे. देशभरात लाखांवर विमाधारक जोडले गेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात विशेष मोहीम सुरु करण्यात आलेली आहे, तरी यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर केशव बावनकुळे यांनी केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...