संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ :- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने "उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य" महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महावितरणतर्फे दिनांक २५ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवानिमित्त 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता 'नियोजन भवन' यवतमाळ येथे आणि 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता 'बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेज कॉन्फरन्स हॉल' पुसद या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत जिल्ह्यात मागील 8 वर्षात ऊर्जा क्षेत्रात झालेल्या भरीव कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जाक्षेत्रातील आव्हाने आणि सन 2047 पर्यंतचे ऊर्जेचे असलेले नियोजन हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात केंद्रव राज्य शासनाच्या योजनेच्या लाभधारक आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या आणि मराठी भाषेत अनुवादीत केलेल्या 7 चित्रफीती दाखविण्यात येणार आहे. यात युनिव्हर्सल हाऊसहोल्ड इलेक्ट्रीफीकेशन, व्हीलेज इलेक्ट्रीफीकेशन, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्ट्रेंथींग, कॅपॅसिटी या चित्रफीतीचा समावेश आहे.
यासोबतच शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या जीवनात पडलेला फरक दर्शविणारे नुक्कड नाटक आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे या कार्यक्रमादरम्यान सादरीकरण करण्यात येणार आहे.
"उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य" या महोत्सवाच्या समोरापात दिनांक 30 जुलै रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे दिल्लीवरून ऊर्जा विभागाअंतर्गत वितरण क्षेत्रात वितरण प्रणालीचे बळकटीकरण (RDSS) या नविन योजनेची सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर नॅशनल पोर्टल फॉर सोलर रुफटॉप या पोर्टलचे लॉंचिंग करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी लोकप्रतिनीधी व प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आले असून नागरिकांनी देखील याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...