आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा अनेक घटना पुढे येत आहे अशीच एक घटना यवतमाळ येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसिलदार अजय गौरकार यांनी भ्रमणध्वनी वरून जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके यांना धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी असून अश्या प्रवृत्ती चा निषेध व या धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना दिलेल्या निवेदनातून राळेगाव तालुका पत्रकार संघटनेने केली आहे.
ओंकार चेके यांनी शालेय विध्यार्यांना वेळेवर लागणारे शालेय दाखले जे महसूल विभागातील तहसिल कार्यालयातून मिळत असतात आणि हे दाखले मिळण्यास विलंब झाल्यास विध्यार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ते लवकर मिळावे या उद्देशाने वृत्त प्रकाशित केले, यावरून नायब तहसिलदार यांनी हे वृत्त का ? प्रकाशित केले असा सवाल करून असभ्य भाषेचा वापर करून धमकी दिली. यावरून पत्रकारांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात वृत्त प्रकाशित करू नये का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित नायब तहसिलदारा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे, उपाध्यक्ष विशाल मासुरकर, दीपक पवार, सचिव फिरोज लाखाणी, महेश शेंडे, राष्ट्रपाल भोंगाडे, सचिन राडे, धिरज खेडेकर, रामू भोयर, राजू काळे, प्रविण गायकवाड, रणजीत परचाके, शालीक पाल, विनोद माहुरे, मनोहर बोभाटे सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...