Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / माजी शिक्षण मंत्री...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेब व जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ मानकर यांच्या नेतृत्वात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेब व जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ मानकर यांच्या नेतृत्वात  राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): गेल्या पाच ते सहा दिवसात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे आण‌ि इतर नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारला राळेगाव तहसीलदारांना भेटून निवेदन दिले.

गेल्या चार-पाच दिवसात जोरदार कोसळलेल्या पावसाने सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. तर कापूस शेतात भरपूर पाणी साचून राहिल्यामुळे रोपे कुजण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. आधी पाऊस नव्हता म्हणून व आता अतिवृष्टी झाली म्हणून शेतकरी चिंतेत आहेत.

जुलै 2022 च्या दुसऱ्याच आठवड्यात राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन ईतर पीकपाणी पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.राळेगाव तालुक्यातील अंदाजे ३०० ते ४०० हेक्टर शेतजमीन सतत चार-पाच दिवस पाण्याखाली राहिल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी यांना तहसीलदारांनी आदेश द्यावेत आण‌ि जागेवर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली गेली आहे.यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके, काँग्रेस कमेटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर,ओ.बी.सी सेल जिल्हाध्यक्ष अरविंदजी वाढोनकर,तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुने,नगराध्यक्ष रवींद्र शेराम,उपनगराध्यक्ष जानराव गिरी,मिलिंद इंगोले,अंकुश मुनेश्वर,अफसर अली सैय्यद,अशोक काचोळे,बी.यु.राऊत,बादशाह काझी,अंकीत कटारिया,किशोर धामंदे,राजू पुडके, निलेश हिवरकर इत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...