Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव येथे बकरी ईद...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव येथे बकरी ईद उत्साहात साजरी...

मारेगाव येथे बकरी ईद उत्साहात साजरी...

मुस्लिम बांधवांनी बकरी ईद ची नमाज अदा करून मागितली जनतेसाठी दुवा

मारेगाव: मुस्लिम समाजात रमजान ईद सोबतच बकरी ईदला फार महत्त्व आहे बकरी ईद म्हणजे अल्लासाठी आपल्याला प्रिय असलेली अल्लाह च्या चरणी कुर्बानी करणे याला इस्लाम धर्मात फार मोठे महत्त्व आहे. म्हणून मुस्लिम बांधव गरीब गरजू बांधवांना अन्नदान करीत असतात.

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून यावर्षी रविवारी, 10 जुलै 2022 रोजी हा सन साजरा करण्यात आला.

बकरी ईद हा सण मुस्लिम धर्मातील लोक मिठी ईदच्या 70 दिवसांनी म्हणजेच ईद उल फित्र नंतर साजरा करतात. हा त्यागाचा सण आहे आणि तो अल्लाहच्या भक्तीचे उदाहरण आहे.

हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते. हजरत इब्राहिमने अल्लाहच्या आज्ञेवर निष्ठा दाखवण्यासाठी आपला मुलगा इस्माईलचा बळी देण्याचे मान्य केले होते. हजरत इब्राहिम जेव्हा आपल्या मुलाचे बलिदान देण्यासाठी पुढे निघाले तेव्हा देवाने त्यांची निष्ठा पाहून इस्माईलच्या बलिदानाचे दुंबेच्या (बकरी) च्या बलिदानात रूपांतर केले. इस्लामच्या धार्मिक श्रद्धेनुसार हजरत इब्राहिम अल्लाहचे पैगंबर होते.

मारेगाव तालुक्यात सतत पाऊस सुरु असल्याने बकरी ईद ची  नमाज शेतकरी सुविधा हॉल मारेगाव येथे गौसिया मज्जिदचे मौलाना हाफिज वशिम सहाब यांनी दि.10 जुलै रविवारला 8 वा कुराण शरीफ चे पठण करीत, नमाज अदा केली.यावेळी शहरांतील असंख्य मुस्लिम बांधवांनी बकरीची नमाज अदा करून देशातील हिन्दू मुस्लिम एकते साठी  दुवा केली.

मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांनी मुस्लिम बांधवांना बकरीच्या शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम बांधवांनी गळाभेट करून एकमेकांना बकरीच्या शुभेच्छा देऊन बकरी उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...