वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील धानोरा परिसरात बेंबळा प्रकल्प कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी रामूजी भोयर यांनी बोलतांना दिली.
सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बेंबळा प्रकल्प कालव्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी दोन ते तीन वर्षे झाली पुर्ण झाली आहेत.
परंतु राळेगाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाली असल्याची ओरड शेतकऱ्यांन मध्ये होताना दिसत आहे. सदर बेंबळा प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा प्रकार तालुक्यात सुरू आहे.
तर अशा एक ना अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे सदर काही दिवसांपूर्वी खडकी येथिल शेतकरी देविदास तेलतुंबडे यांचे तीन एकर चना पिक बेंबळाचे पाणी शेतात शिरल्याने जमिनदोस्त झाले होते याबाबत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा वेळोवेळी लेखी स्वरूपात दावा करुन सुध्दा नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
तर धानोरा,रिधोरा परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सदर धानोरा येथील शेतकरी रामूजी भोयर शेत सर्वे नंबर १२२/ शेती एक हेक्टर ७४ आर या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात एप्रिल,मे मध्ये बेंबळा कालव्याचे काम करण्यात आले होती परंतु एक ते दोन महिन्यांच्या कालावधीतच संपूर्ण कामाला भेगा पडल्या आहेत तर धानोरा ते येवती रोड पास करून पुढे कालव्याचे काम चालू केले आहे परंतु रोड पास करून पुढे काम करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा पि.डब्लुडी या विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
परंतू यांना या दोन्ही विभाग यांनी रोड फोडून काम करण्याची परवानगी दिली का ? मग यांना रोडफोडुन काम करण्याची परवानगी दिली असेल तर अजुनपर्यंत फोडलेल्या रोडची दुरुस्ती का केली नाही? असाही प्रश्न रामूजी भोयर यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व बाबीची योग्य ती चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.सदर या बाबींची योग्य ती चौकशी न झाल्यास जिल्हा अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल असे मत शेतकरी रामूजी भोयर यांनी व्यक्त केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...