Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव ग्रामीण रुग्णालयात...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव ग्रामीण रुग्णालयात ई.सी.जी.मशीनचे लोकार्पण.

मारेगाव ग्रामीण रुग्णालयात ई.सी.जी.मशीनचे लोकार्पण.

जनहित कल्याण संघटनेचा उपक्रम, लोकार्पण सोहळ्यात शेकडोची उपस्थिती

दिलदार शेख मारेगाव:- जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक गौरीशंकर खुराणा यांचे कडुन रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगावला ई.सी.जी मशीन भेट देण्यात आली.यावेळी स्वर्गीय अजय पाटील यांचे स्मूर्थी प्रित्यर्थ  श्रीमती,प्रिया अजय पाटील व त्यांच्या मुली त्रिशला व स्वरा यांचे हस्ते हा ई. सी.जी.मशीन चा लोकार्पण सोहळा शेकडो लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असते.त्याचाच एक भाग म्हणून रुग्णालयात ई. सी.जी.मशिन नसल्याने तालुक्यातील नागरिकांना वणी यवतमाळ चंद्रपूर शिवाय पर्याय नव्हता.याची दखल जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी घेतली व रुग्णालयाला BIOMEDICS CARDITECH 3i कंपनीची ई.सी.जी.मशीन भेट देण्याचा ठाम निश्चय केला.

हा लोकार्पण सोहळा 5 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत अजय गोवर्धन पाटील यांच्या स्मूर्थी प्रित्यर्थ श्रीमती,प्रिया अजय पाटील व त्यांच्या मुली त्रिशला, स्वरा यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वणीचे माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा,माजी सभापती शीतल ताई पोटे, ऍड. सुरज महारतळे,कृ.उ.बा.स.उपसभापती वसंतराव आसुटकर, मुना कुरेशी,गौरी शंकर खुराणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज चौधरी, डाँ. पायल पवार ,जयश्री इंगोले नगरसेवक नंदेश्वर आसुटकर,रवी पोटे,रवींद्र धानोरकर, नगरसेवक अनिल गेडाम,नगरसेवक हेमंत नराजें,संगीता ताई गाडगे,विजया ताई कांबळे,चंद्रशेखर जोगी, नीलेश तेलंग,रॉयल सयद,प्रफुल उरकूडे, समीर कुडमेथे, गौरव आसेकर,प्रमोद रिंगोलो,काशीनाथ खडसे,दिनकर डुकरे आदी जनहित कल्याण संघटनेचे शेकडो युवक,महिला वर्ग उपस्थित होते.

 

नवं युवकांच्या आग्रहास्तव परिसरातील जनतेच्या मदतीसाठी व त्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जनहित कल्याण संघटनेची नुकतेच आम्ही स्थापना केली.संघटनेत परिसरातील शेकडो च्या वर युवक वर्ग सहभागी आहे. संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज ई. सी.जी.मशीन चे लोकार्पण करण्यात आले असुन रुग्णांच्या 24 तास आरोग्य सेवेसाठी लवकरच रुग्णवाहिका चे सुद्धा लोकार्पण करण्यात येईल.:- गौरीशंकर खुराणा (अध्यक्ष- जनहित कल्याण संघटना मारेगाव) 

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...