आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दिलदार शेख, मारेगाव:- जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक गौरीशंकर खुराणा यांचे कडुन रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगावला ई.सी.जी मशीन भेट देण्यात आली. यावेळी स्वर्गीय अजय पाटील यांचे स्मूर्थी प्रित्यर्थ श्रीमती,प्रिया अजय पाटील व त्यांच्या मुली त्रिशला व स्वरा यांचे हस्ते हा ई. सी.जी.मशीन चा लोकार्पण सोहळा शेकडो लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असते.त्याचाच एक भाग म्हणून रुग्णालयात ई. सी.जी.मशिन नसल्याने तालुक्यातील नागरिकांना वणी यवतमाळ चंद्रपूर शिवाय पर्याय नव्हता.याची दखल जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी घेतली व रुग्णालयाला BIOMEDICS CARDITECH 3i कंपनीची ई.सी.जी.मशीन भेट देण्याचा ठाम निश्चय केला.
हा लोकार्पण सोहळा 5 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत अजय गोवर्धन पाटील यांच्या स्मूर्थी प्रित्यर्थ श्रीमती,प्रिया अजय पाटील व त्यांच्या मुली त्रिशला, स्वरा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वणीचे माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा,माजी सभापती शीतल ताई पोटे, ऍड. सुरज महारतळे,कृ.उ.बा.स.उपसभापती वसंतराव आसुटकर, मुना कुरेशी,गौरी शंकर खुराणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज चौधरी, डाँ. पायल पवार ,जयश्री इंगोले नगरसेवक नंदेश्वर आसुटकर,रवी पोटे,रवींद्र धानोरकर, नगरसेवक अनिल गेडाम,नगरसेवक हेमंत नराजें,संगीता ताई गाडगे,विजया ताई कांबळे,चंद्रशेखर जोगी, नीलेश तेलंग,रॉयल सयद,प्रफुल उरकूडे, समीर कुडमेथे, गौरव आसेकर,प्रमोद रिंगोलो,काशीनाथ खडसे,दिनकर डुकरे आदी जनहित कल्याण संघटनेचे शेकडो युवक,महिला वर्ग उपस्थित होते.
बॉक्स
नवं युवकांच्या आग्रहास्तव परिसरातील जनतेच्या मदतीसाठी व त्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जनहित कल्याण संघटनेची नुकतेच आम्ही स्थापना केली.संघटनेत परिसरातील शेकडो च्या वर युवक वर्ग सहभागी आहे. संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज ई. सी.जी.मशीन चे लोकार्पण करण्यात आले असुन रुग्णांच्या 24 तास आरोग्य सेवेसाठी लवकरच रुग्णवाहिका चे सुद्धा लोकार्पण करण्यात येईल.
गौरीशंकर खुराणा
अध्यक्ष- जनहित कल्याण संघटना मारेगाव
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...