आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ :- पावसाळ्यात लहान बालकाना अतिसार होउ नये याकरीता आजारापुर्वीच दक्षता घेणे आवश्यक असून हात स्वच्छ धुणे व उकळुन थंड केलेले पाणी पिण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमाले येडगे यांनी दिल्या आहेत.
आरोग्य विभाग मार्फत 1 जूलै ते 15 जूलै दरम्यान राबविण्यात येत असलेल्या धडक अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते वजांरी फैल येथील नागरी आरोग्य सेवा केंद्रात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ एन.डी.चव्हाण, डीआरसीएचओ डॉ संजयकुमार पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ क्रांतीकुमार नावंनदिकर, डॉ प्रीती दुधे, वै. अ डॉ नाझीया काझी, डॉ अमित व्यव्हारे, मनीषा तीरपुडे उपस्थित होते .
जिल्हाधिकारी यांनी आशा मार्फत गृहभेटीदरम्यान प्रत्येक लाभार्थीना ओ.आर.एस. द्रावण कसे तयार करावे या बाबत प्रात्यक्षीक करून दाखवीण्याच्याही सुचना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की या मोहिमे अंतर्गत जिल्हातील एकूण 0 ते 5 वर्ष वयोगटातील दोन लाख 32 हजार 706 लाभार्थीना 2363 आशा व आरोग्य कर्मचारी मार्फत गृह भेटी देऊन झिंक गोळ्या व ओ. आर. एस. वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हात 3221 ओ.आर.टी कॉर्नर प्रत्येक अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयु दवाखाना, ग्रामीण रूग्णालय या ठिकाणी २४ तास कार्यरत राहणार आहे.
योग्य स्तनपान व पुरक आहारामुळे १५ टक्के, वॉश अॅक्टीवीटी मुळे ३ टक्के असे एकुण एक चतुर्थाशं मृत्यू आपल्याला धडक अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेत कमी करावयाचे शासनाचे धोरण आहे. ही मोहिम राबविणे करीता पाणी व स्वच्छता विभाग, महिला बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग याना सुचना देण्यात आल्या असल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले.
या मोहिमेत आशा स्वयंसेविका व अगंणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी गावातील गरोदर माता व स्तनदा माता करीता प्रात्यक्षिक व समुदेशन करणार आहे व निव्वळ स्तनपान व पुरक आहार या विषयी महत्व पटवून देणार आहे. कुपोशीत बालकाना संदर्भ सेवा देण्यात येईल तसेच हिरकणी कक्षाचा वापरास प्रोत्साहन देण्यात येइल.
सर्व शाळा, अगंणवाडी मध्ये हात धुवा मोहिम राबविणार व हात स्वच्छ धुण्याचे महत्व व पध्दती बद्दल माहिती देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी डॉ. चव्हाण यांनी सांगीतले. या वेळी या प्रसंगी मान्यवराच्या उपस्थितीत रुक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यांनी केले.
धडक अतिसार नियंत्रण पंधरवाडा यशस्विरित्या राबविणे करीता ए. एनएम शाहीना शेख, पदमा मेश्राम, आरती राठोड, प्रणाली सवई, वैशाली मनवर, अभिजीत दोउके, धनंजय मेश्राम, धीरज पीसे, अमित पांडे, प्रफुल डेहनकर यानी सहकार्य केले .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...