झरी: झरी तालुक्यातील अनेक शेतकरी वर्ग विक्रांत छाप सोयाबीन बोगस निघाल्याच्या चर्चेला उधाण आले असल्याचे कळते. तालुक्यातील कीत्तेक शेतकर्यांनी सोयाबीन बीयान्याची पेरणी केली परंतु बीयाने उगवलेच नाही. त्यामुळे सोयाबीन पेरणी करणार्या शेतकर्यांचा पैसा व वेळ दोन्ही गोष्टी वाया गेली असल्याचे सांगितल्याने खळबळ उडत आहे. दर वर्षी बोगस बीयाने विकल्या जातात मात्र कार्यवाही ला बगल दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
बोगस कंपन्यांतर्फे कृषी केंद्रात बोगस बीयाने सर्रास विकल्या जातात मात्र त्यांच्यावरही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले असून दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामध्ये नरेंद्र गूर्लावार, संजय मूत्यमवार, दत्तात्रय मूत्यमवार, नागेश्वर गुर्लावार, आकाश गड्डमवार, सागर गड्डमवार, रविंद्र संकसवार या पाटन येथील शेतकर्यांनी वाट्स ॲपवरून नावे सूद्धा पाठविण्यात आली आहे.
आधीच हवालदिल झालेला शेतकर्यांनी मोठ्या मुश्किलीने तडजोड करून कर्ज काढून बी बीयाने खत खरेदी केली. आता तेच बोगस बीयाने निघाल्याने शेतकर्यांच्या चिंता वाढल्या असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. अशा कारणांमुळे तालूका कृषी विभागाने लक्ष द्यावे असे नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गाकडून बोलल्या जात असल्याचे समजते.