झरी:-आधुनिक तंत्रज्ञान, त्याचे डिझाइन ही केवळ एक कल्पनारम्य निर्मिती न उरता ते तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या व्यक्तींना तसेच निरनिराळ्या उद्योगांना उपयुक्त ठरणे, ही येत्या काळाची गरज आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते. या शास्त्रालाच उत्पादनाचा वापर करणाऱ्याच्या ‘सुलभ अनुभवाची रचना’ किवा ‘मानव- तंत्रज्ञान- सुसंवाद’ किंवा वापरकर्त्यांला केंद्रस्थानी ठेवून केलेली रचना म्हणतात. आधुनिक जगातील प्रत्येक उत्पादन किंवा सेवा यांच्या उपयुक्ततेसाठी आणि गुणवत्तेसाठी हे शास्त्र अत्यंत आवश्यक ठरले आहे.
आज जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपकी ३४ % लोक इंटरनेट वापरतात, इंटरनेटवर ६० कोटींपेक्षा जास्त संकेतस्थळं उपलब्ध आहेत, दरवर्षी पाच कोटी नवीन संकेतस्थळं तयार होतात, जगातील २ अब्जपेक्षा जास्त लोक ई-मेल सुविधा वापरतात, दररोज गुगल सर्चद्वारे १८१ देशांतील लोक १४६ भाषा वापरून एकूण १ अब्ज प्रश्नांची उत्तरे शोधतात. जगातील ८७ % लोक मोबाइल फोन वापरतात. भारतात लोकसंख्येच्या ७० टक्के लोक मोबाइल फोन वापरतात. साधारणत: २ अब्ज संगणक नियमितपणे वापरले जातात. अब्जावधी लोक आणि शेकडो कंपन्या लाखो सॉफ्टवेअर वापरतात. जगभर साधारणत: २२ लाख एटीएम मशिन्स वापरल्या जातात..
ही आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की, तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने/सेवा किती प्रचंड प्रमाणात उपयोगात आणल्या जातात. अशी उत्पादने/सेवा केवळ आखीवरेखीव व सुंदर असून चालत नाहीत तर त्या उपयोगी सुद्धा असाव्या लागतात. त्यामागे एक उपयुक्त कल्पना किंवा विचार असावा लागतो. शिवाय जागतिक बाजारपेठेत असणाऱ्या वेगवान स्पर्धेत टिकून यशस्वी व्हायचे असेल तर उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच उपयुक्तता आणि आकर्षक असणेही महत्त्वाचे ठरत आहे.
युजर एक्सपिरिअन्स डिझाइन प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायची झाल्यास असं म्हणता येईल की, लोकांना किंवा संभाव्य वापरकर्त्यांना उत्पादनाकडून किंवा सेवेकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या सध्याच्या अडचणी काय आहेत? त्यांची आवड-नावड काय आहे? त्यांच्या गरजा काय आहेत? त्यांच्या मर्यादा काय आहेत? त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या संधी आहेत? अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन केला जातो.
या माहितीच्या आधारे उत्पादनाची संकल्पना तयार केली जाते. ही संकल्पना पुन्हा लोकांना दाखवली जाते आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन उत्पादनाची अंतिम रचना- डिझाइन तयार केले जाते. याचं अगदी आपल्याशी संबंधित उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण जे मोबाइल फोन वापरतो, ते फोन तयार करणारे या सर्व प्रमुख कंपन्या संभाव्य वापरकर्त्यांचा परिपूर्ण अभ्यास करतात आणि मगच फोनचे नवीन मॉडेल तयार करतात.
या सर्व गोष्टींचा विचार करूनसोयीचे आणि आकर्षक दिसणारे संकेतस्थळ वाटते. याचं श्रेय गुगल कंपनीच्या उपयोगशीलता-तज्ज्ञांना, रचनाकारांना आणि युजरइंटरफेस डिजाइनर यांना जातं.अशा मुळे गुगलने लोकांच्या आवडीनिवडीचा अभ्यास करूनच अशी यशस्वी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. व नवनवीन डीझाईनला महत्व देत युजर ईंटरफेस च्या माध्यमातून जनतेला पहायला मिळत आहे.