संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी: येथील भाकप,AIYF,AISF यांच्यासह शहरातील पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने आज दि. 20 जुन रोजी निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने काॅ.अनिल घाटे आणि भाई अनिल तेलंग यांचे नेत्रुत्वात SDO साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी "सेव्ह युथ, सेव्ह इंडिया", "इन्कलाब जिंदाबाद", "शहीद भगतसिंह को लाल सलाम" या घोषणा दिल्या.
आंदोलकांनी युवकविरोधी असलेल्या अग्नीवीर व अग्नीपथ योजनेच जाहीर धिक्कार केला. यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली. अनिल घाटे यांनी हे देशातील बहुजन तरूणाईविरोधी षडयंत्र असल्याचे सांगितले तसेच अनिल तेलंग यांनी बेरोजगार तरूणाईची केंद्र सरकार मोठी दिशाभुल करत असल्याचे सांगितले तसेच येत्या काळात जर सरकारने हि योजना मागे घेतली नाही तर शेतकरी आंदोलनासारखे युवक आंदोलन देशभर उभे राहिल, असे सांगितले.
ऑल इंडिया युथ फेडरेशनचे भारत केमेकार व पांडुरंग ठावरी यांनी सांगितले कि देशातील कामगार कायदे संपविण्याचे षडयंत्र हे सरकार करत आहे. त्याची ट्रायल म्हणून या योजना सरकारने पुढे आणल्याचे दिसत आहे. या योजनेआडून कामगार कायद्यांवर घाला घालायचे काम सुरू आहे. केंद्रातील सरकार बहुजनविरोधी असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. हि योजना बहुजन तरूणांचे भविष्य धोक्यात आणत आहे. चार वर्षानंतर 'ना पेन्शन, ना वेतन" अशा पेचात टाकून तरूणांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आणत आहे. मोदी सरकारचे हे भांडवलदारी षडयंत्र भारतीय समाजाचे लष्करीकरण करण्याचा डाव दिसत आहे.
चार वर्षानंतर या मुलांना ना नोकरी, ना रोजगार मिळणार, ना सामाजिक सुरक्षा व सन्मान मिळणार. या बेरोजगारी संकटामुळे देशात नवी अराजकता येण्याचा धोका आहे. दोन कोटी रोजगाराचा प्रश्न टाळण्यासाठी दहा लाख नोकऱ्या चे अमिष दाखविले आहे. त्या अमिषाचाच एक भाग हि योजना दिसत आहे. या भ्रामक योजनेमुळे बहुजन समाजात अस्वस्थता निर्माण झालेली आहे कारण व्यापाऱ्यांची मुले रिक्रुट भरती होत नाहीत तर बहुजनांची होतात. त्यांचे भविष्य धोक्यात आणण्याचा हा 'बनिया डाव' मोदी सरकारने टाकलेला दिसत आहे.करीता अग्नीपथ नावाची फसवी योजना तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.यावेळी बहुसंख्येने युवक सहभागी झाले होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...