Home / यवतमाळ-जिल्हा / खते व बियाण्यांची कृत्रीम...

यवतमाळ-जिल्हा

खते व बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

खते व बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करा  - जिल्हाधिकारी अमोल येडगे
ads images
ads images
ads images

बीजप्रक्रीया व अमरपट्टा पेरणीचे प्रात्याक्षीके शेतकऱ्यांच्या बांधावर घ्या

जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ।। कृषी निविष्ठाच्या तक्रारी 9403961157 या क्रमांकावर नोंदवा ।। बियाणे खरेदीची पावती जपून ठेवा

Advertisement

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ :- जिल्ह्यात खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची कृत्रीम टंचाई निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांना चुकीचे बियाणे देवून कोणी फसवणूक करणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे व जाणूनबुजून टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आमले येडगे यांनी कृषी विभागाला दिले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गुवणवत्ता नियंत्रण अधिकारी शिवा जाधव, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच खते व बियाणे कंपण्याचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बीजप्रक्रीया व कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या अमरपट्टा पेरणी चे प्रात्याक्षीके घेवून शेतकऱ्यांना त्याची माहिती देण्याचे तसेच त्यांना जैविक खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबतही जिल्हाधिकारी येडगे यांनी सूचना दिल्या.

उगवण क्षमता नसलेले बियाणे आढळल्यास संबंधीतांकडून नुकसाण भरपाई मिळविण्यासाठी बीयाणे खरेदीच्या पावती उपयुक्त ठरेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची पावती जपून ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध होण्या करीता तसेच कृषी निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी जशा की जादा दराने विक्री करणे, मुदत बाह्य कृषी निविष्ठांची विक्री करणे, साठेबाजी करणे व अनधिकृत कृषी निविष्ठा व बियाण्यांची विक्री करणे अशा प्रकारच्या तक्रारी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 9403961157 या क्रमांकावर शेतकऱ्यांनी नोंदवाव्या. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल. नियंत्रण कक्षाचा हा नंबर कृषी विभागाने सर्वांपर्यंत पोहचवावा, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी तसेच खत व बियाणे कंपण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...