आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने दहावीचा बोर्डाचा निकाल आज 17 जुलै 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाइन जाहीर केला.
या परीक्षेत मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १००% लागला असून तब्बल 16 विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आले.या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येत असतात ही विशेष बाब. याही वर्षी गुरुकुल शाळा झरी जामनी तालुक्यातुन पहिली आली.गुरुकुल कॉन्व्हेंट चा विद्यार्थी लौकिक निखाडे 94.60% गुण प्राप्त करून शाळेतून तसेच तालुक्यातुन प्रथम आला तर शर्वरी ठाकरे 93.00% व श्रावणी गडेवार 93.00 अनुक्रमे द्वितीय, शिवम आकीनवार 92.80% तृतीय, प्रज्योत पारखी 92.60% चतुर्थ, मृणाल नगराळे 92.40% पाचवा, राणी वरहाटे 92.20% सहावा, श्रुती देवंतवार 91.60% सातवा, क्रिश खडसे 91.20% आठवा, आदित्य आसुटकर 90.80% नववा, रुतीक ठाकरे 90.60% दहावा, रोहित भगत 90.40% व, गौरव निब्रड 90.40% अनुक्रमे अकरावा, स्वरूप चेलपेलवार 90.20%, आयुषी क्षिरसागर 90.20% व उज्वला जांभुळकर 90.20% अनुक्रमे बारावा क्रमांक प्राप्त केला.
तब्बल 29 विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल १००% टक्के लागलेला आहे. एकूण 56 पैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च: विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदद्ल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ,संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. सुभाष गजभिये सर सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.