Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / रावेरी भांब एकबूर्जी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

रावेरी भांब एकबूर्जी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रफुल्ल मानकर गटाच्या राजेंद्र तेलंगे गटाकडून भाजप सेनेचे पाणीपत

रावेरी भांब एकबूर्जी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रफुल्ल मानकर गटाच्या राजेंद्र तेलंगे गटाकडून भाजप सेनेचे पाणीपत

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी) : राळेगाव तालुक्यातील रावेरी हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे समजले जात असून या गावात वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळे पद भुषविणारे,भुषवित असलेले पदाधिकारी असून सोबतच या गावात हनुमानजीचे मंदिर असल्यामुळे कुठल्याही निवडणूकीचा नारळ फोडून शुभारंभ सुद्धा केला जातो.

त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक पक्षातील तालुका स्तरावरील नेत्यांनी या सोसायटीत अप्रत्यक्षपणे लक्ष केंद्रित केले होते.तर या निवडणुकीत भाजपा सेना विरूद्ध प्रफुल्ल मानकरांचा कांग्रेस समर्पित गट  ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीच्या माध्यमातून आमने-सामने  तयार झाला होता.गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेपासून तर निवडणूक पार पडेपर्यंत तिन्ही गावातील कार्यकर्ते प्रचाराला लागले होते.हा हा म्हणता म्हणता 14/6/2022 तारीख आली आणि मतदानाला सुरुवात झाली.

मतदान पार पडले मतमोजणी पूर्ण झाली आणि अवाक् होणारा निकाल हाती आला.जिकडे तिकडे हाहांकार माजला कि राजेंद्र तेलंगे यांच्या तेराही सिटा मोठ्या फरकाने निवडून आल्या विशेष म्हणजे या गटाचे मुख्य श्री राजेंद्र तेलंगे यांनी सर्वांत जास्त मते मिळवून मतदारांचे असलेले प्रेम दाखवून दिले. 

या निवडणुकीत अनेक तालुकास्तरीय नेते मी म्हणून उभे होते परंतु त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला.आणि यामध्ये भाजपा सेना सत्तेपासून दूर गेली आणि परत कांग्रेस समर्पित प्रफुल्ल मानकर गटाचे तेराही उमेदवार निवडून आले.त्यामध्ये कर्जदार गटातून सर्वस्वी राजेंद्र वामनराव तेलंगे,  दुर्गेश सुर्यभानजी शिवणकर, जयवंत शेखरराव झाडे,  विनोद नामदेवराव कुबडे, सतिश शेषराव कोरडे, गजेंद्र उद्धवराव चौधरी, गजानन जनार्दन झाडे, पंजाबराव चंद्रभान हिवरकर,तर अनुसूचित जाती जमाती या गटातून नारायण विठोबा मडावी,तर विमुक्त जाती भटक्या जमाती या गटातून रमेश विठोबा शिवरकर तर ईतर मागास प्रवर्ग या गटातून विजय देवराव पिंपरे, तर महिला राखीव गटातून सौ.चंदा वासुदेव धोटे व सौ.निता राजेश भुडे हे उमेदवार भरपूर मतांनी विजयी झाले. 

विशेष म्हणजे या निवडणुकीत काही तालुकास्तरीय नेत्यांनी आपली जादूची कांडी फिरविण्याचा प्रयत्न केला परंतु  प्रफुल्लभाऊंच्या राजकीय खेळीमुळे ते अयशस्वी ठरले.या झालेल्या निवडणुकीत तिन्ही गावातील  सर्वस्वी तानबाजी कुरटकर,रमेशराव चंदनखेडे, नामदेवराव कुरटकर,पांडुरगजी रोहणकर,गजानन झोटींग,  नरेशराव पाल , दिपकराव सातपुते , देविदास खेकारे , अनिल कुरटकर, अरविंद निखाडे ,मोरेश्वर डाखोरे,  देविदासजी  हिवरकर, शेखरराव झाडे, अनंतराव झाडे,जनकराव आडे अभिषेक उत्तरवार ,राजू चिंचोळकर  राजू शिवणकर, विलास खुडसंगे, निलेश शेलवटे, योगेश कुटे, किशोर आत्राम, सह अनेक कार्यकर्त्यांनी यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...