Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / रिधोरा येथे शेतकरी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

रिधोरा येथे शेतकरी प्रशिक्षण  कार्यक्रम संपन्‍न...

रिधोरा येथे शेतकरी प्रशिक्षण  कार्यक्रम संपन्‍न...

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे ९ जून रोजी एकात्मिक कापुस व सोयाबीन उतपादनत वाढ व मुल्‍य साखळी विकास कार्यक्रम व हंगाम पुर्व प्रशक्षिण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले होते या कार्यक्रमात कृष‍ि विज्ञान केंद्र यवतमाळ येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.सुरेश नेमाडे यांनी सोयाबीन व कापुस पिकांचे लागवड तंत्रज्ञान या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले यामध्‍ये प्रामुख्‍याने माती नमुने तपासणी करणे व त्‍याचे महत्‍व ,बियाणे निवड , बीज प्रक्रीया , लागवड पध्‍दत, लागवड दिशा त्‍याचे पिका वर होणार परीणाम, पिकाचे वाढीच्‍या अवस्‍था त्‍यानुसार करावयाचे व्‍यवस्‍थापन याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. प्रामुख्‍याने कापुस पिक वाढीच्‍या अवस्‍थेत घ्‍यावयाची काळजी तसेच खताची मात्र , संजीवकांची वाढ रोखनाऱ्या औषधांचा वापर कधी व कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.तसेच शेतकरी यांनी विशेष एका खताची मागणी न करता उपलब्‍ध सरळ खते / मिश्र खते वापरुन पिकाची मुख्‍य अन्‍न्‍द्रव्‍याची गरज भागवावी असे आवाहन देखील केले.

कौशल्‍य आधारीत कृषि प्रश‍िक्षणात त्‍यानंतर दिलीपजी फुके (वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ पुरस्‍कार विजेते यांनी रुंद सरी वरंबा लागवड तंत्रज्ञान (बीबीएफ) या बाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले बी बी एफ यंत्राद्वारे लागवडीमुळे बियाणे , मजुरी बचत या सोबत उत्‍पादनातील फरक याचे आर्थिक गणीत उपस्थित शेतकरी यांना समजुन सांगितले . बीबीएफ यंत्र वापरामुळे बियाणे बचत, मजुरीत बचत, मुलस्‍थानी जलसंधारण , यासोबत अति पावसात अथवा पावसात खंड पडल्‍यास पिक कसे तग धरते व रुद सरी वरंबा याचा कसा फायदा होतो याबाबत सविस्‍तर मागर्ग्‍दर्शन केले.

या मागर्दर्शनानंतर डॉ. प्रमोद मगर कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी सोयाबीन व कापुस या पिकातील मुख्‍य किडींबाबत मार्गदर्शन केले यामध्‍ये बीजप्रक्रिया त्‍याचे महत्‍व व फायदे, निबोळी अंर्क कसा तयार करावा व त्‍याचे वापर, किडींची शोध व निरीक्षणे त्‍यानूसार किडकनाश‍कांचा वापर याबाबत मार्गग्‍दर्शन केले चिकट सापळे, कामगंध सापळे यांचे महत्‍व व त्‍यानुसार फवारणीबाबचा घ्‍यावयाचा निर्णय यासोबत फवारणी बाबतचे अर्थशास्‍त्र् उपस्थितांना समजावुन सांगितले या सोबतच कीटकनाशक फवारणी करताना घ्‍यावयाची काळजी , संरक्षक किट चा वापर करणे, फवारणी करताना काय करावे व करु नये याबाबतची सर्वाना माहिती दिली
यानंतर सीड डेसींग ड्रम व विदयुत चलित यंत्राद्वारे बीज प्रक्रीया प्रात्‍यक्षिक करण्‍यात आले व बीबीएफ यंत्राद्वारे प्रत्‍यक्ष पेरणी करण्‍यात आली या कार्यक्रमावेळी व प्रात्‍यक्ष‍िका वेळी शेतकरी यांच्‍या शंकाचे निरसण करण्‍यात आले.

तसेच तालुक्यातील बिबीयफ धारक श्री हिरालाल काळे रीधोरा, खुशाल तोडसे आष्टा, प्रवीण इटाळे, निखिल शेळके चहांद , अमोल भुरसे वाऱ्हा , गजानन चिव्हणे व्हाऱ्हा या शेतकऱ्यांनी अवजारा सह ट्रॅक्टर कार्यक्रम स्थळी उपलब्ध करून प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच कृषी विभागाच्या महा डीबिटी अंतर्गत विविध योजना बाबत महा डीबिटि तंत्रज्ञ गौरव रामगडे श्री गुरुकृपा कॉम्प्युटर राळेगाव स्वतः कार्यक्रमाच्या स्थळी कॅम्प घेऊन कृषी विभागाच्या योजनेचे अर्ज भरून घेतले.त्यामुळे रिधोरा परिसरातील शेतकऱ्यांना यंत्र प्रत्यक्ष बघायला मिळाले. त्यामुळे आनंदाचे वातावरण मिळाले.

या कार्यक्रमावेळी श्री.नवनाथ कोळपकर जिल्‍हा अधिक्षक कृष‍ि अधिकारी, यवतमाळ , डॉ नेमाडे, श्री दिलीपजी फुके ,डॉ श्री मगर, श्री गौळकर सरपंच रिधोरा , हरीश काळे प्रगतीशिल शेतकरी व वडकी येथील कृषी सेवा केंद्र विक्रेते श्रीकांत गावंडे, उमेश गौऊळकार, दिपक नालमवार,चेतन धानोरकर, पवण कांडुरवार,श्रीकांत मानकर, धरमेश बोथरा व रिधोरा परिसरातील शेतकरी वर्ग व टॅक्‍टर चालक मोठया संख्‍येने उपस्‍थित होते कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री जोशी तालुका कृषी अधिकारी, राळेगाव यांनी केले तर सुत्र् संचालन मयुर शिरभाते तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी केले या कार्यक्रमासाठी श्री कल्‍पेश वाघमारे मंडळ अधिकारी वाढोणा बाजार तसेच तालुका कृषि अधिकारी राळेगाव याचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेवुन कार्यक्रम यशस्‍वी केला.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...