झरी:- तालुक्यातील ७ पर्वाना धारक देशी दारू दुकानदारांनी नियम धाब्यावर बसवून गोरगरीब जनतेला जास्त दराने दारूची विक्री करून लाखोंरुपयांनी लुटत आहे. याला सर्वस्वी जवाबदार अबकारी विभाग असून देशी दारू दुकांदारावर कार्यवाहि कोन करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या नियमाने दारूच्या शिशिवर असलेल्या किमती पेक्षा जास्त दराने दारूची विक्री करू नये असे सक्तीचे आदेश असतांना सुद्धा तालुक्यातील परवाना धारक देशी दुकानदार कुणालाही न जुमानता गोरगरीब जनतेला भुलथाव देऊन जास्त दराने देशी दारूची विक्री करित आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अबकारी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी याना देशी दारू दुकानदारांकडून एक पेटीमागे दहा रुल्ये प्रमाणे पैसे द्यावे लागत असल्याची माहिती आहे. दारू दुकानदार यानी जास्त पेट्या विक्री करावे याकरिता अबकारी विभाग कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचे माहिती आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मिळावेत या करिता जास्त दारूच्या पेट्या विकून त्यांना महिन्याकाठी मोठी रक्कम मिळण्याची धावपळ करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
अबकारी विभागाच्या मिलीभगत मुळे देशी दारू दुकानदारांकडून गोरगरीब मजूर जनतेला एका शिशिवर १०.५० चडत घेऊन लुटल्या जात आहे. एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणात दारूच्या पेट्या विक्री व्हावे याकरिता शासनाचे नियम मोडून खुलेआम दारुची ठोक विक्री सुद्धा मोठया प्रमाणात केल्या जात आहे. तालुक्यातील बहुतांश दुकानदाराच्या दारुच्या पेट्या प्रत्येक खेडेपड्यात जात आहे.
याबाबतची माहिती अबकारी विभागाला माहीत असून "चोर चोर मावस भाऊ" सारखी झाली असल्याची चर्चा आहे. शासनाने एका शिशीच्या मागे २.५० रुपये तर पेटी मागे १२० रुपए मिळत असताना मागे १२० ते १५० मिळत असताना सुद्धा ३५०० पासून तर ४५०० असे. हजारोने ठोक विक्री करू लाखो रुपये दररोज कमवीत आहे. गेलेली मागील काही दिवस दारूचे दर वाढले असे ग्राहकांना स गुण ६० रुपयाचा पव्वा ८० रुपयाने विक्री करून लाखो रुपयांनी लुटण्याचे काम परवाना धारक देशी दारू दुकानदारांनी केले.
शासनाचे नियम मोडून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून पैशाने लुटणाऱ्या देशी दारू दुकान दारावर अबकारी विभाग कार्यवाही करणार की झोपून राहणार असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहे. सदर दुकान दारावर फौजदारी कार्यवाही न केल्यास व ६९.५० एमआरपी पेक्षा जास्त पैसे घेतल्यास काही सामाजिक संघटना आंदोलन व उपोषण करणार असल्याची चर्चा आहे.