झरी: झरी तालुक्यातील अडेगाव येथे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष झरी तालूका आशिष झाडे शिवराज्याभिषेक सोहळ्या चे औचित्य साधून रूग्ण वाहिका उपलब्ध करून दिल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शिवरायांच्या दमदार इतिहासाला स्मरण करून त्यांच्या कार्याचे महत्त्व समजून घेताना सामान्य माणसालाही नवल वाटते. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. या दिवशी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.
शिवजयंतीप्रमाणेच शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल दोन गटांमध्ये मतभेद आहेत. यातील एक गट 6 जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. तर काहींच्या मते तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो.
शिवराज्याभिषेकाच्या क्षणी शिवभक्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेतात. या दिवशी शिवप्रेमी एकमेकांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतात.शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आज अडेगाव येथे रुग्णवाहिका सेवा चालू करून त्याचे उद्घाटन करण्यात आले या वेळी अडेगाव वासि व संभाजी ब्रिगेडचे झरी ता अध्यक्ष आशीष झाडे ,देव येवले, सूमित शिरसागर पुरुषोत्तम हीवरकर, सारंग आसुटकर भारत उरकुडे, रवी कडूकर असे खूप सारे अडेगाव वाशी हजर होते हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.