झरी: फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यांसाठी ३१ मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक दिली आहे.
महाराष्ट्रासह देशातील १९ राज्यांत हे आंदोलन करण्यात येणार असून,आज पासून खासगी पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फेडरेशनच्या मते, ‘‘पेट्रोलियम डिलर्स वर्षांनुवर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राबत आहेत. नोटाबंदीसारख्या आव्हानात्मक निर्णयात आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य केले.
त्यानंतर प्रशासकीय चौकशीला आम्हाला सामोरे जावे लागले. करोनाकाळातही आम्ही जोखीम पत्करून सेवा दिली.
गेल्या पाच वर्षांत आमच्या भांडवली गुंतवणुकीत दुपटीने वाढ झाली. मात्र, उत्पन्न वाढले नाही.’’ अशा ईतरही कारणांमुळे एकदिवसीय पेट्रोल पंप बंद पूकारला असल्याचे अनेक वृत्तपत्रांतून समजते आहे