वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✨ राळेगांव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड
'सारे भारतीय माझे बांधव आहेत ', ही प्रतिज्ञा लोकशाहीला अभिप्रेत मूल्यांची रुजवनुक व्हावी म्हणून आपण स्वीकारली. पण ती आपल्यात रुजली का आणि आपल्या वर्तवणूकीत त्याचे प्रतिबिंब उमटते का याचे उत्तर बहुदा नकारातमक येते. आजही वाड्या -वत्सातील अनेक जमाती उपेक्षेच्या शिकार ठरल्या आहे. राळेगाव तालुक्यातील गोपालनगर पारधी बेडा पाहिला कीं याचा प्रत्यय येतो. पिण्याच्या पाण्याकरिता येथील पारधी बांधवाची वणवण संपायचे नाव घेत नाही. गुन्हेगारी जमात ही मानसिकता आजही त्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. अनेक समस्या आहेत पण कुणी लक्ष दयायला तयार नाही.
तालुक्यातील आदिवासी बहुल व संपूर्ण पारधी समाज असलेले साडेचारशे लोकसंख्येचे असलेले गोपालनगर हे गावं. ४५ अंश तापमानात पाण्यासाठी पायपीट करीत आहे . कोणत्याच योजनांची प्रभावी अंलबजावणी या ठिकाणी होतं नाही. कागदोपत्रि खर्चाचे आकडे लाखोत असतील प्रत्यक्षात मात्र स्थिती विदारक आहे. श्रीरामपूर कोदुर्ली गोपालनगर गटग्रामपंचायत आहे . यातच गोपालनगर मध्ये शंभर टक्के पारधी समाज आहे . विकासा पासून कोसो दूर असलेल्या गोपालनगर मध्ये काही उच्च विद्याविभूषीत तरुण देखील आहेत नाही असे नाही . मात्र यांच्या प्रति असणारा दूषित पूर्वग्रह दृष्टिकोन यांच्या विकासाच्या आड येतं आहे.
शिक्षण, आरोग्य, जाणीवजागृती, आर्थिक हलाखी या मुद्यावर इथे मोठे कामं करण्याची गरज आहे. अशिक्षितपणा, व्यसनाधिंनता, यातून फोफावलेला अवैध दारूचा व्यवसाय व पोलिसांच्या सतत च्या धाडी. यात सर्वांनाच गुन्हेगार ठरवन्याचा अघोषित मापदंड या मुळे यांचे जगणेही मुश्किल झाले आहे.
मानवीय दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा यांना गुन्हेगार म्हणून पाहण्याची जी एक चुकीची परंपरा निर्माण झाली ती यांच्या विकासाच्या आड येतांना दिसते. साधे पिण्याचे पाणी देखील यांना मिळू नये अशी स्थिती त्यामुळेच निर्माण झाली.
गोपालनगर गावाला पाणी पुरवठा करणारी योजना पाचवर्षापूर्वी कार्यान्वित झाली . छोटया मोठ्या समस्येने पाणी पुरवठा खंडीत होतो .सद्य स्थितीत पाणी पूरवठा करणारी यंत्रणा नादुरस्त आहे . याला कारण शुल्लक आहे . विहीरी वरून पाणी पुरवठा गावात होतो गावांत पाणी देण्याची व्यवस्था करणारा व्हॉल अज्ञात व्यक्ती ने फोडला या घटनेला एकमहिना झाला सरपंच व ग्रामसेवकाला माहिती दिली त्यांनी थातूरमातूर चौकशी केली निष्पन्न काहीच झाले नाही. एक हॅन्डपम्प आहे पण या ठिकाणी पाणी कमी व वादच अधिक होतात. येत्या दोनदिवसात व्हॉलची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर आम्ही पंचायत समिती समोर उपोषणाला बसल्या शिवाय राहणार नाही असा ईशारा पवन पंजाबराव पवार , सोमनाथ पवार, पंकेश पवार, विठ्ठल पवार, प्रकाश फुलमाळी , सुखदेव पवार, श्रावण काळे, कांलींदा काळे, सागर फुलमाळी , गणेश पवार या ग्रामस्थानी दिला आहे .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...