Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / राजकारण निवडणुकी पुरते...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

राजकारण निवडणुकी पुरते मर्यादित का ?

राजकारण निवडणुकी पुरते मर्यादित का ?
ads images

झरी: झरी तालुक्यात बर्याच ठिकाणी राजकारणात निवडूण आल्यावर मतदारांना दिलेल्या आश्वासनाचा विसर राजकारण्यांना पडल्यचे दिसते. सूर्वातीला मत मिळविण्यासाठी खूप आनाभाका घेतात की मी हे करतो मी ते करतो एकदा निवडून खुर्चीवर आरूढ झाले की दिलेल्या आश्वासनाकडे दूर्लक्ष केल्या जात आहे. तालुक्यात अनेक निवडणूका होतात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रा.वि.वि. का. सोसायटी, कृषी बाजार समितीच्या व इतरही कीत्तेक समीत्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात. कारभार हातात आल्यावर पदांचा उपयोग दूरूपयोग झालेल्या बातम्या अनेक वृत्तपत्रांतून वाचनात येत असतात. काही वेळापुरता विचार करून उपयोग होणार नाही. कारण शासकीय निधी पैसा म्हणजे देशातील तालुक्याच्या प्रत्येक नागरिकांनी भरलेला टॅक्स होय. 

टॅक्स हा एकच नाही तर पाण्याचा, राहत्या घराचा, विजेचा, रस्त्याचा, वापरलेल्या पैशाचा अशा अनेक स्वरूपांत कर भरूनच आपल्या क्षेत्राच व्यवस्थापन करण्यासाठी शासन निधी मार्फत पैसा उपलब्ध होतात. आपल राज्य आपला जिल्हा, आपला तालुका, आपली ग्रामपंचायती सूद्धा कस चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे ? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ?  तालुका स्तरावरील शासन कशासाठी चालवलं पाहिजे?याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणं, व नंतर ते सत्यात उतरवणं म्हणजे राजकारण होय.

''सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घटकाच्या प्रभावाने विशिष्ट विचार अंगीकारुन विशिष्ट समाज, समुह, संस्था, भूभाग यावर सत्ता मिळविण्यासाठी व सत्ता, प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण''राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे.असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे. अशा गोष्टींचा विसर पडता कामा नये.

झरी तालुक्यात वीज, पाणी, रस्ते बांधकामाच्या समश्या  सूठता सूटेना उन्हाळ्यात पाण्याची समस्या कायम उभी राहात आहे. वीजेची समश्या, रस्ते बांधकाम समश्या, पर्यावरणाची समश्या त्यासोबत रोजगार निर्मिती होने काळाची गरज वाटत आहे. परंतु काही राजकारण्यांना फक्त निवडणूक आवश्यक वाटते हे नाईलाजाने दुर्दैव म्हणावे लागेल. शासन मात्र निवडणूक नागरीकांना सोई सुविधा उपलब्ध व्हावे क्षेत्रातील वेगवेगळ्या कामाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन  व्हावे यासाठी घडवतात. राजकीय नेते पुढार्यांनी यावर नक्की विचार करायला हवा.  

आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल, प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल. राजकारणाला लढाई समजू नये. राजकारणाला समाज सेवेचे साधन समजायला हरकत नाही. या गोष्टी प्रत्येक राजकीय नेते पुढार्यांनी लक्षात घेने आवश्यक वाटते. असे झाल्यास आपला जिल्हा, आपला तालुका, गाव समाजात  विकास होऊन प्रगती मध्ये वृध्दी झाल्या शिवाय राहणार नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची अजूनही वेळ गेलेली नाही समजून एक नवीन ऊर्जा, जोश निर्माण करून स्वतामधील बूध्दी गुणांचा वापर करून जन कल्याणासाठी कार्य करायला काही हरकत नाही. या गोष्टी जनतेच्या निदर्शनास येईल तेव्हाच राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित नाही असे वाटेल. अन्यथा राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित दुर्दैवाने म्हणावे लागेल.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...