आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): जिल्ह्यातील विविध जलसंधारण प्रकल्पामध्ये साठलेला गाळ जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या परवानगीने स्वखर्चाने सदर गाळ नेण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे
जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती जलशक्ती अभियान आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विभाग निहाय धरण व त्यामध्ये सद्य:स्थितीत असलेला गाळ याबाबत जिल्हाधिकारी यांनी नुकताच आढावा घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता राठोड, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, यवतमाळ प्रकल्पt बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन बनसोड, अरूणावती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. भ. बागुल, यवतमाळ पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता अ. आ. जाधव, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे, मृद व जलसंधारण विभाग (जि. प.) चे जिल्हा जलसंधारण अधिकारी भु. म. दमाहे, सहाय्यक वनसंरक्षक अ. ना. डिगोळे, जलसंधारण अधिकारी आय. एस. भुरे व एस. बी. लाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता ईच्छुक शेतकरी यांनी सर्वप्रथम ज्या प्रकल्पामधुन गाळ घ्यावयाचा आहे त्या प्रकल्पाशी संबंधीत विभागास विहीत नमुण्यात अर्ज सादर
करुन परवानगी घ्यावी. गाळ काढतांना धरणाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. धरणामधील गाळ हा शेतक-यांनी स्वखर्चाने संबंधित विभागाच्या दिशानिर्देशांचे तंतोतंत पालन करुन काढावा. सदर गाळाचा वापर हा फक्त शेतीत टाकण्यासाठीच करण्यात यावा. यासंबंधात शेतकरी अथवा अशासकीय संस्था यांचे विहीत नमुण्यातील अर्ज प्राप्त होताच त्यांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व विभाग प्रमुखांना सुचीत केले. गाळ उपसण्याचे काम १०० टक्के लोकसहभागातुन १५ जुन २०२२ पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांनी दिले.
मृद व जलसंधारण विभागाकडील ८ योजना व जिल्हा परिषदेकडील २५ योजना, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस यांच्या विभागाकडील १५ योजनांमध्ये तर
यवतमाळ पाटबंधारे विभाग यांचेकडील १६ योजनांमधुन गाळाचा उपसा केला जाऊ शकतो अशी माहिती संबंधित अधिकारी यांनी बैठकीत दिली. बैठकीला जलसंधारण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...