Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / विविध क्षेत्रातील उत्कृष्ट...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने घेण्यात आलेल्या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हो होते या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उकृष्ट अशी  कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

हा सत्कार समारंभ सोहळा दिं १४ मे २०२२ रोज शनिवारला  शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ यांचे भव्य पटांगणात  सुप्रसिद्ध पार्श्वगायक ख्यातनाम  प्रकाशनाथ पाटणकर यांच्या उपस्थितीत  पार पडला असून यात पत्राकारिता क्षेत्रात  साप्ताहिक राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी  तसेच दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी विशाल मासुळकर तर दैनिक नमो महाराष्ट्राचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल भोंगाडे तर सामाजिक क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोवर्धन वाघमारे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर ,यवतमाळ येथील साहित्यिक गोपीचंद कांबळे तसेच पोलीस क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावत असणारे (खुपिया )माजी सैनिक युवराज पाईकराव तर कोरोना काळात ज्यांनी निशुल्क सेवा दिली असे डॉ  बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल लढे, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा  सत्कार समारंभ सोहळा व सन्मान चिन्ह  साहित्यिक गोपीचंद कांबळे यांच्या हस्ते पार पडला असून या कार्यक्रमाला उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर  विचार मंचाचे बाबाराव नगराळे,इंद्रजीत लभाने, विनायक नगराळे,बबलू कांबळे, बबन ढाले,अक्षय नगराळे, चंद्रगुप्त भगत,रमेश वनकर,अक्षय ढाले, राजू नगराळे,चेतन लढे आदी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...