Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / तिघांनी केली होती विलास...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

तिघांनी केली होती विलास गौरकारची हत्या; सहा दिवसानंतर लागला आरोपींचा छडा.

तिघांनी केली होती विलास गौरकारची हत्या; सहा दिवसानंतर लागला आरोपींचा छडा.

मारेगाव: जुन्या वादातून  तिघांनी शेतकऱ्याचा बैल ठार मारण्याचे नियोजन मारेगावातील एका बार मध्ये आखले.त्यानुसार तिघे शेतातील गोठ्यात जाऊन विषारी औषधीने बैल ठार मारण्याचे इंजेक्शन देण्याचे ठरले असतांना जागली गेलेल्या विलास गौरकार नामक शेतकऱ्यांने हटकले असता तिघांनी मिळून विलासचा गळा आवळून हत्या केली.गेल्या सहा दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे मुख्य सूत्रधारासह 3 आरोपींचा मारेगाव पोलिसांनी छडा लावून अटक केली.

अजित गैबिदास फुलझेले (३९),प्रशांत भोजराज काटकर (३४), रुपेश शंकरराव नैताम (२९) सर्व रा. नवरगाव ता.मारेगाव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेची सविस्तर माहिती  अशी की , पोलीसांच्या ताब्यात असलेला विशाल झाडे व अजित फुलझेले यांची मारेगावच्या एका बिअरबार मध्ये भेट झाली.त्याच्या समवेत प्रशांत काटकर व रुपेश नैताम यावेळी हजर होते. विशाल व फिर्यादी सतीश गौरकार यांचे जुन्या वादातून सतिशचे गोठ्यातील बैल विषारी इंजेक्शन च्या साहाय्याने मारण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रशांत व रुपेश, अजित हे डोर्ली शिवारातील दि.८ मे  रोज रविवारच्या रात्री गोठा शिरताना  विलास गौरकार हा  शेतात जागली असल्याने.तो गोठ्याजवळ येताच त्यांची तिघा आरोपीसोबत बाचाबाची होवून नशेच्या अवस्थेतील आरोपींनी विलासला जमिनीखाली  पाडुन.रुपेश हा विलासच्या अंगावर बसून अजित व प्रशांत यांनी दुपट्ट्याने विलास गौरकार याचा गळा आवळला व यातच विलासचा मृत्यू झाला.

तालुक्यात खळबळ उडवुन देणाऱ्या खुनाचे रहस्य उलगडण्यासाठी फिर्यादीच्या तक्रारीवरून घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संशायित विशाल झाडे यास अटक केली होती. मात्र ठोस धागेदोरे गवसत नव्हते .पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील जलदगतीने तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या सहा दिवसात हत्येचा उलगडा करण्यात आला हा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ ,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पुरी  यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. आर.सावंत , जमादार आनंद आलचेवार , नितीन खांदवे , रजनीकांत पाटील , विवेक राठोड , अफजल खान पठाण , अजय वाभीटकर यांनी आज दि.१५ मे रोज रविवारच्या पहाटे या घटनेचा तपास  लावला.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...