Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शहरातील मुख्य रस्ता...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शहरातील मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा...

शहरातील मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा...

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा राळेगांव शहरातून जातोय आणि या वर्षभरात हा प्रमुख हमरस्ता सध्या जीवघेणा ठरत आहे. या सहा महिन्यात सहा जण जीवानिशी गेले आहे .या साठी नानाविध कारणांमुळे या दोन निष्पाप व चार कुटुंब प्रमुखांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा तयार करतांना च खूप उणीवा राहिल्या,या संदर्भात प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधी वेळोवेळी वृत्त प्रकाशित करुन संभाव्य धोके निदर्शनास आणून दिले होते.पण कोणीचं लक्ष दिलं नसल्याने आता याचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. आजही चालक अती मद्य प्राशन करुन सुसाट वेगाने धावणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

रस्ता दुभाजाकावर अनेक जण आदळल्याने गंभीर जखमी झाले, तर अवजड ट्रक ने मध्ये लावलेले अनेक कठडे नामशेष केले. दोन प्रमुख अपघातात मुख्य कारण चारचाकी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे चर्चेअंती कळतं. दोन किलोमीटर अंतराचा शहरातून जातोय.भरधाव वेगाने धावत जाणारी सर्व प्रकारची वाहने,वाहतूक नियमांचे सातत्याने होणारं उल्लंघन,पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष,चॅम्पियन्स बाईक रायडर्स चा दिवसेंदिवस वाढत असलेला हैदोस,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नॅशनल हायवे वर गतिरोधक बसविण्यात केलेली मनाई, मधोमध असलेले पथदिवे अर्ध्या दूर पर्यंत बंद चं, रस्ता दुभाजाकाने दोन फूट अंतर व्यापलयं, दोन्ही बाजूला असलले अतिक्रमीत व्यवसाय धारक आणि दुकानां समोर वाहनांची भाऊगर्दी,सह बेशिस्त या महत्त्वाच्या बाबीं अपघाता साठी कारणीभूत आहे.

आता या साठी काय कायमस्वरुपी उपाय योजना,जेणेकरून जीवितहानी टळतील अशी खमठोक भूमिका विद्यमान खासदार, आमदार,नगर पंचायत राळेगांव,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,सार्वजनिक बांधकाम विभाग सह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेणे आवश्यक आहे हे विशेष....

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...