Home / यवतमाळ-जिल्हा / सहा वर्षाच्या चिमुकलीवर...

यवतमाळ-जिल्हा

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ६० दिवसात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा...

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ६० दिवसात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा...
ads images
ads images
ads images

जलदगती न्यायाल्यामध्ये केस चालवून दोन महिन्याच्या आत केला न्यायनिवाडा ।। तिहेरी जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा.

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ: पोलीस स्टेशन आर्णी येथे दिनांक १३ मार्च २०२२ रोजी हदयद्रावक अशी तक्रार प्राप्त झाली को, अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेची पोलीसांनी त्वरीत दखल घेत अपराध क्रमांक २६०/२०२२ कलम ३७६,३७६(अ)(ब), ५०६ भा.द.वि. सह कलम ४,
६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सह कलमं ३ (२) (व्हीए), ३ (१) (डब्ल्यू) ()(1) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा पोलीस स्टेशन आर्णी येथे नोंद करुन तपासाचे चक्रे फिरवली व अवघ्या दोन तासात आरोपी नामे संजय ऊर्फ मुक्‍या मोहन जाधव यास जेरबंद केले.

Advertisement

फिर्यादी यांचे घराचे काही घर दुर अंतरावर आरोपीचे घर असुन पिडीत मुलगी ही नेहमी सारखी दिनांक १३ मार्च २०२२ रोजी आपल्या घराबाहेर खेळत असताना आरोपीने पिडीत मुलीस चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी बोलावले. 

अल्लड व निरागस त्या पिडीत मुलीला समाजातील विकृतीची अद्याप पुर्ण ओळख नसल्याने ती त्याच्या घरी दाखल झाली व तिथेच नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केला व त्यावरही कळस म्हणून आरोपीने तिच्या हातात पाच रुपये ठेऊन बजावले की, कोणालाही काही सांगायचे नाही व तिला घराकडे वळते केले. 

पिडीत मुलगी रडत रडत आपल्या घरी आली तेवढयातच कामा निमीत्त बाहेर गेलेली तिची आई सुध्दा घरी आली. आईला पाहताच मुलीने हंबरडा फोडला व आईला बिलगली, आई तिची विचारपुस करणारच तेवढ्यातच तिला मुलीच्या कपडयावर रक्ताचे डाग दिसले व आईच्या हदयाचा ठोका चुकला, ती भांबावली व काहीतरी अनुचित प्रकार आपल्या मुलीसोबत झालेला आहे हे तिच्या लक्षात येताच तिने मुलीची विचारपुस केली तेव्हा पिडीत मुलीने तिच्या आर्जव शब्दात सर्व
आपबिती आपल्या आई कडे मांडली. आईने क्षणाचाही विलंब नकरता आपल्या मुलीला पोटाशी कवटाळत आर्णी पोलीस स्टेशन गाठुन गुन्हा नोंद केला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ, पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी सदरचा गुन्हा उपविभागिय पोलीस अधिकारी, दारव्हा यांचे कडे सुपर्द केला. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात श्री. अनिल आडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा व पोलीस निरीक्षक श्री. पितांबर जाधव, ठाणेदार पोस्टे, आर्णी यांनी करुन अवघ्या दोन तासात आरोपी नामे संजय ऊर्फ मुक्या मोहन जाधव, वय २४ वर्ष, रा, बोरगाव, ता. आर्णी, जि. यवतमाळ यास हेरुन अटक केली, तसेच घटनास्थळ पंचनामा व घटनास्थळावरील सर्व पुराव्यांची व्यवस्थित जुळवा- जुळव केली. 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा श्री. आदित्य मिरखेलकर यांनी अतिशय कोौशल्यपुर्वक हाताळुन सर्व तांत्रिक पुरावे व वस्तुनिष्ठ पुरावे यांची सांगड घालीत साक्षीदार यांचे बयान तपासात दाखल केले. तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळा, अमरावती येथे व्यक्तीशह: सतत पाठपुरावा करुन रासायनिक विश्लेषणाचे अहवाल मागवुन घेतले व अवघ्या ९१० दिवसात तपास पुर्ण करुन भक्कम अशा पुराव्यानिशी अरोपीविरुध्द दि. २२/०३/२०२२ रोजी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

समाजास काळीमा फासणारे अशा गुन्हेगारांना शिक्षाच झालीच पाहिजे या उद्देशाने संपुर्ण तपास पक्रियेवर बारौक लक्ष ठेऊन असलेले व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पोलीस अधिक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ यांच्या विशेष प्रयन्ताने सदरची केस ही जलद गती न्यायलयात घेण्यात आली व त्याकरीता जिल्हा सरकारी अभियोक्ता, यवतमाळ श्रीमती नीती दवे यांची व त्यांच्या मदतिला सहा. सरकारी अभियोक्ता श्री. अंकुश देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली.

आरोपी पक्ष व सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद ऐकुण जिल्हा व सत्र न्यायाधिश, दारव्हा श्री. ह. ल. मनवर यांनी
आरोपी विरुध्द सादर करण्यात आलेल्या पुराव्याची योग्य दखल घेत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.
(१) कलम ६ बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा, २०१२ अन्वये आजीवन कारावास व रुपये ५,०००/- आर्थिक दंड
(२) कलम ३७६ (अ)(ब) भा.द.बी. अन्वये आजीवन कारावास ब रुपये ५,०००/- आर्थिक दंड.
(३) कलम ३ (२)(४) अँट्रासिटी कायद्या अंतर्गत आजिवन कारावास व रुपये ५,०००/- आर्थिक दंड.

अशी ऐतिहासीक तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच शिक्षे अंतर्गत आर्थिक दंडाची रुपये १५,०००/- ही
रक्‍कम पिडीत मुलीला देण्याचे आदेश पारीत केले.
सदर गुन्ह्याचा तपास डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ. खंडेराव धरणे, अपर
पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या विशेष मार्गदर्शनात श्री. आदित्य मिरखेलकर सहायक पोलीस, अधीक्षक तथा
उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा यांनी पुर्ण केला असुन श्री. अनिल आडे, तत्कालीन उपविभागीय पोलीस
अधिकारी, दारव्हा, पो.नि. श्री. पितांबर जाधव, ठाणेदार आर्णी, पो.उपनि. श्री. वनदेव कापडे वाचक फौजदार,
उपबिपोअ कार्यालय, दारव्हा, पो.ना. बापुराव दोडके, शाम मेहसरे व पोहवा सतिष चौधार यांनी सहकार्य केले तसेच
न्यायानयीन सुनावनी दरम्यान पैरवी अधिकारी म्हणुन पो.हवा. गजानन भगत व पो.का. मंगेश जगताप पोस्टे आर्णि
यांनी मोलाचे काम पाहिले.

सदरचा अत्यंत गंभिर, संवेदनशिल बालअत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास विक्रमी वेळेत गुणात्मक रित्या सबळ
पुराव्याच्या आधारे १० दिवसात पुर्ण करुन आरोपीस ऐतिहासीक तिहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळविण्यामध्ये यशस्वी व

कामगीरी करण्याऱ्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना रु. ५०,०००/- रोख, सी नोट ४

जी.एस.टी. प्रोत्साहानपर बक्षिस डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ, पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी जाहीर केले आहे.

- डॉ दिलीप भुजबळ)
'पोलीस अधीक्षक, यवतमाळ

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...