Home / यवतमाळ-जिल्हा / आर्णी / सहा वर्षाच्या चिमुकलीवर...

यवतमाळ-जिल्हा    |    आर्णी

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ६० दिवसात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा.

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ६० दिवसात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा.

जलदगती न्यायाल्यामध्ये केस चालवून दोन महिन्याच्या आत केला न्यायनिवाडा. तिहेरी जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा.

पोलीस स्टेशन आर्णी येथे दिनांक १३ मार्च २०२२ रोजी हदयद्रावक अशी तक्रार प्राप्त झाली कि, अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेची पोलीसांनी त्वरीत दखल घेत अपराध क्रमांक २६०/२०२२ कलम ३७६,३७६(अ)(ब), ५०६ भा.द.वि. सह कलम ४, ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सह कलमं ३ (२) (व्हीए), ३ (१) (डब्ल्यू) ()(1) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा पोलीस स्टेशन आर्णी येथे नोंद करुन तपासाचे चक्रे फिरवली व अवघ्या दोन तासात आरोपी नामे संजय ऊर्फ मुक्‍या मोहन जाधव यास जेरबंद केले.

फिर्यादी यांचे घराचे काही घर दुर अंतरावर आरोपीचे घर असुन पिडीत मुलगी ही नेहमी सारखी दिनांक १३ मार्च २०२२ रोजी आपल्या घराबाहेर खेळत असताना आरोपीने पिडीत मुलीस चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी बोलावले. अल्लड व निरागस त्या पिडीत मुलीला समाजातील विकृतीची अद्याप पुर्ण ओळख नसल्याने ती त्याच्या
घरी दाखल झाली व तिथेच नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केला व त्यावरही कळस म्हणून आरोपीने तिच्या हातात पाच रुपये ठेऊन बजावले की, कोणालाही काही सांगायचे नाही व तिला घराकडे वळते केले. पिडीत मुलगी रडत रडत आपल्या घरी आली तेवढयातच कामा निमीत्त बाहेर गेलेली तिची आई सुध्दा घरी आली. आईला पाहताच मुलीने हंबरडा फोडला व आईला बिलगली, आई तिची विचारपुस करणारच तेवढ्यातच तिला मुलीच्या कपडयावर रक्ताचे डाग दिसले व आईच्या हदयाचा ठोका चुकला, ती भांबावली व काहीतरी अनुचित प्रकार आपल्या मुलीसोबत झालेला आहे हे तिच्या लक्षात येताच तिने मुलीची विचारपुस केली तेव्हा पिडीत मुलीने तिच्या आर्जव शब्दात सर्व
आपबिती आपल्या आई कडे मांडली. आईने क्षणाचाही विलंब नकरता आपल्या मुलीला पोटाशी कवटाळत आर्णी पोलीस स्टेशन गाठुन गुन्हा नोंद केला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ, पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी सदरचा गुन्हा उपविभागिय पोलीस अधिकारी, दारव्हा यांचे कडे सुपर्द केला. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात श्री. अनिल आडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा व पोलीस निरीक्षक श्री. पितांबर जाधव, ठाणेदार पोस्टे, आर्णी यांनी करुन अवघ्या दोन तासात आरोपी नामे संजय ऊर्फ मुक्या मोहन जाधव, वय २४ वर्ष, रा, बोरगाव, ता. आर्णी, जि. यवतमाळ यास हेरुन अटक केली, तसेच घटनास्थळ पंचनामा व घटनास्थळावरील सर्व पुराव्यांची व्यवस्थित जुळवा- जुळव केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा श्री. आदित्य मिरखेलकर यांनी
अतिशय कोौशल्यपुर्वक हाताळुन सर्व तांत्रिक पुरावे व वस्तुनिष्ठ पुरावे यांची सांगड घालीत साक्षीदार यांचे बयान तपासात दाखल केले. तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळा, अमरावती येथे व्यक्तीशह: सतत पाठपुरावा करुन रासायनिक विश्लेषणाचे अहवाल मागवुन घेतले व अवघ्या ९१० दिवसात तपास पुर्ण करुन भक्कम अशा पुराव्यानिशी अरोपीविरुध्द दि. २२/०३/२०२२ रोजी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

समाजास काळीमा फासणारे अशा गुन्हेगारांना शिक्षाच झालीच पाहिजे या उद्देशाने संपुर्ण तपास पक्रियेवर बारौक लक्ष ठेऊन असलेले व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पोलीस अधिक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ यांच्या विशेष प्रयन्ताने सदरची केस ही जलद गती न्यायलयात घेण्यात आली व त्याकरीता जिल्हा सरकारी अभियोक्ता, यवतमाळ श्रीमती नीती दवे यांची व त्यांच्या मदतिला सहा. सरकारी अभियोक्ता श्री. अंकुश देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

आर्णीतील बातम्या

नवउदयोन्मुख कवयित्री कु पूर्वी विलास मडावी ची आई या विषयावर काव्यरचना

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री...

आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील "शासन आपल्या दारी शिबिराला" जिल्हाधिकारी यांची भेट

यवतमाळ :-नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी...

*धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*

यवतमाळ, दि ३ मार्च (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यात ७ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व...