आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): कोविडचा धोका पुर्णपणे टळलेला नाही, इतर ठिकाणी कोरोनाचे रूग्ण अद्यापही आढळून येत आहे. कोरोनावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असून लसीकरणात दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेने कोविड लसीकरणाची गती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोविड टास्क फार्सच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुकास्तरीय यंत्रणेकडून दूरदृष्य प्रणालीद्वारे कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, साथरोग अधिकारी डॉ. तनवीर शेख तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हात 12 ते 14 वयोगटात लसचा पहिला डोज 44 टक्के तर 15 ते 17 वयोगटात 51 टक्के पुर्ण झाला आहे, हे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच 18 वर्षावरील वयोगटात दुसरा डोज 61 टक्के झाला असून दुसऱ्या डोजचे लसीकरण वाढविण्यावर यंत्रणेने विशेष फोकस करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप दुसरा डोज न घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस व प्रिकॉशन डोज देवून लसिकरण पुर्ण करणे, आवश्यकतेनुसार घरोघरी लसिकरणाची टिम पाठवणे, लसीकरणाची प्रलंबित डाटा एन्ट्री पुर्ण करणे, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात लसिकरणासाठी शिबीरे घेण्याचे, एका लसिकरण केंद्रावर रोज किमान 100 डोज देण्याचे, उन्हाळा असल्याने लसिकरणाला सकाळी 7 वाजेपासूनच सुरूवात करण्याचे तसेच लसिकरणाचे ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हा कोरोमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांना लसिकरण पुर्ण करून घेण्याबाबत विविध माध्यमांतून जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लसिकरणाची माहिती जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी बैठकीत सादर केली. जिल्हास्तरावर 1 लाख सहा हजार 100 कॉर्बोव्हॅक्स, 50 हजार कोव्हॅक्सीन व 42 हजार 900 कोविशिल्ड लससाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगीतले बैठकीला महसूल व आरोग्य विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...